Lifestyle News : सूर्यप्रकाशामुळे आपल्या आरोग्याला होणारे फायदे ; वाचा सविस्तर

| Published : Apr 12 2024, 01:21 PM IST

sun light can cure vastu dosh

सार

निरभ्र आकाश आणि प्रसन्न सूर्यप्रकाश हे समीकरण अनेकांचं आरोग्य उत्तम करतं. आपल्या आयुष्यात प्रकाशाची नेमकी भूमिका काय आहे? आपल्या हाडांसाठी आणि मेंदूसाठी प्रकाश किती आवश्यक असतो?जाणून घ्या

आपल्या शरीराला सूर्यप्रकाशाचे अनेक फायदे आहेत.निरभ्र आकाश आणि प्रसन्न सूर्यप्रकाश हे समीकरण अनेकांचं आरोग्य उत्तम करतं. आपल्या आयुष्यात प्रकाशाची नेमकी भूमिका काय आहे? आपल्या हाडांसाठी आणि मेंदूसाठी प्रकाश किती आवश्यक असतो?जाणून घ्या

प्रकाशामुळे झोप लागते :

प्रकाशामुळे आपल्या शरीरात झोपेची प्रक्रिया सुरू होते.प्रकाश कमी झाला किंवा अंधार झाला की आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचं रसायन स्रवतं. बोर्डिंगवेळी प्रखर प्रकाश, जेवणादरम्यान दिवे मंदावले जातात. सूर्यास्ताचा भास निर्माण करतील अशी प्रकाशयोजना प्रवासी झोपताना केली जाते. जेणेकरून त्यांना सहज झोप लागू शकेल.

प्रकाश निद्रानाश टाळू शकतो :

आपण रात्री झोपण्याआधी स्मार्टफोन वापरत असतो. काहीजण लॅपटॉप किंवा टॅब्लेट वापरतात. या उपकरणांमधून निळा प्रकाश बाहेर पडत असतो. या प्रकाशामुळे शरीरात झोपेसाठी तयार होणारं संप्रेरक स्रवत नाही. त्यामुळे मेंदूकडून झोपेसाठी आज्ञा दिली जात नाही. दिवसा मिळणारा प्रकाश आपल्या झोपेचं गणित ठरवतो. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल, तर तुम्ही सकाळच्या वेळी तासभर सूर्यप्रकाशात काढला तर तुमच्या मेंदूला योग्यवेळी झोपेचं समीकरण उलगडेल.

प्रकाश मूड बदलवतो :

नैसर्गिक प्रकाश आपला स्वभाव पालटवू शकतो. प्रकाशाची वारंवारता आपल्याला आनंदी करू शकते. जेव्हा आपलं शरीर प्रकाशाला सामोरं जातं तेव्हा मज्जासंस्थेच्या माध्यमातून मेंदूला सूचना मिळते. त्यावेळी मेंदूत सेरॅटॉनिन हे संप्रेरक स्रवतं. या संप्रेरकामुळे आनंदलहरी उमटतात. तसंच जी माणसं शिफ्टमध्ये काम करतात, त्यांचा प्रकाशाशी संपर्क मर्यादित राहतो. त्यामुळे त्यांना नैराश्याचा त्रास होऊ शकतो.

सूर्यप्रकाश आपली हाडं बळकट करतो :

कॅल्शिअम आणि फॉस्फेट ग्रहण करण्यासाठी आपल्या शरीराला 'ड' जीवनसत्वाची आवश्यकता असते. निरोगी हाडं, दात आणि स्नायूंसाठी महत्वपूर्ण असलेली प्रथिनं.'ड' जीवनसत्वाची कमतरता असेल तर हाडं ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. ड जीवनसत्वाचा सगळ्यात मोठा स्रोत सूर्यप्रकाश आहे. म्हणूनच या जीवनसत्वाला सनशाईन जीवनसत्व असंही म्हणतात. आश्चर्य म्हणजे शरीराला सूर्यप्रकाश मिळाला की 'ड' जीवनसत्वाची निर्मिती होते. म्हणूनच थोडा वेळ सूर्यप्रकाशात उभं राहिलं तरी पुरेसं होतं. मात्र अति सूर्यप्रकाश घातक ठरू शकतो. सनस्क्रीन लावायला विसरू नका आणि टळटळीत उन्हात जाणं टाळा.

आणखी वाचा :

मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर कसा परिणाम होतो? महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी?

Hepatitis : ‘ हिपॅटायटीस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज 3500 लोकांचा मृत्यू;जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

Chitra Navratri च्या उपवासासाठी खास शेंगण्याचे सॅलड, वाचा संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप