- Home
- Utility News
- सावधान! १ जानेवारीपासून विना-HSRP गाड्यांवर आरटीओचा सर्जिकल स्ट्राईक; असा वाचवा १०,००० रुपयांचा दंड
सावधान! १ जानेवारीपासून विना-HSRP गाड्यांवर आरटीओचा सर्जिकल स्ट्राईक; असा वाचवा १०,००० रुपयांचा दंड
HSRP Number Plate : महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP प्लेटची मुदत संपली असून, आता कारवाई सुरू झाली आहे. HSRP नसलेल्या वाहनांना १०,००० रुपयांपर्यंत दंड आणि आरटीओ कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.

सावधान! १ जानेवारीपासून विना-HSRP गाड्यांवर आरटीओचा सर्जिकल स्ट्राईक
मुंबई : जर तुम्ही अजूनही तुमच्या गाडीवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) लावली नसेल, तर सावधान! नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या खिशाला मोठी कात्री लावणारी ठरू शकते. राज्य सरकारने दिलेली ३१ डिसेंबर २०२५ ची अंतिम मुदत आता संपली असून, १ जानेवारी २०२६ पासून महाराष्ट्रभर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम सुरू झाली आहे.
आता 'वेट अँड वॉच' संपलं; थेट दंडाचा दणका!
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना HSRP प्लेट बसवणे सरकारने अनिवार्य केले होते. वारंवार मुदतवाढ देऊनही ज्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यांना आता खालीलप्रमाणे दंडाला सामोरे जावे लागेल:
पहिल्यांदा पकडले गेल्यास: १,००० रुपये दंड.
दुसऱ्यांदा पकडले गेल्यास: ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंतचा मोठा दंड.
केवळ दंडच नाही, तर तुमच्या गाडीवर जर HSRP प्लेट नसेल, तर आरटीओची महत्त्वाची कामे जसे की मालकी हस्तांतरण (Transfer), पासिंग किंवा फिटनेस सर्टिफिकेट मिळवणे अशक्य होईल.
स्टायलिश नंबर प्लेटवरही कारवाईची टांगती तलवार
अनेक वाहनधारकांनी आपल्या गाडीवर मराठी आकडे किंवा फॅन्सी फॉन्टमधील नंबर प्लेट लावल्या आहेत. अशा 'स्टायलिश' प्लेट्सवर आता आरटीओकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. केवळ अधिकृत HSRP प्लेटच कायदेशीर मानली जाईल.
HSRP प्लेट का महत्त्वाची आहे?
१. वाहन चोरीला आळा: या प्लेटवर असलेल्या युनिक 'लेझर कोड'मुळे तुमची गाडी चोरीला गेल्यास तिचा शोध घेणे पोलिसांना सोपे जाते.
२. सुरक्षेची हमी: ही प्लेट सहजासहजी काढता किंवा बदलता येत नाही.
वेळ निघून गेलीय? घाबरू नका, हा मार्ग निवडा!
जरी अंतिम मुदत संपली असली तरी, कारवाईपासून वाचण्याचा एक मार्ग अद्याप खुला आहे.
तातडीने महाराष्ट्र परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
तुमच्या वाहनाचा तपशील भरून ऑनलाइन फी भरा.
नंबर प्लेट बसवण्यासाठी (Fitment) अपॉइंटमेंट बुक करा.
महत्त्वाची टीप
जर तुमच्याकडे ऑनलाइन अपॉइंटमेंटची अधिकृत पावती असेल, तर पोलीस तुमच्यावर कारवाई करणार नाहीत. त्यामुळे दंडाचा भुर्दंड टाळण्यासाठी आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा!

