- Home
- Utility News
- HSC Hall Ticket 2026 Download : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! HSC हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध, लगेच करा डाउनलोड
HSC Hall Ticket 2026 Download : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! HSC हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध, लगेच करा डाउनलोड
HSC Hall Ticket 2026 Download : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध केले. विद्यार्थी वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात, ज्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी अनिवार्य आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या HSC (इयत्ता 12वी) परीक्षेची हॉल तिकीट सोमवारपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन संबंधित विभागाचे अॅडमिट कार्ड सहजपणे डाउनलोड करता येईल. सर्व विभागांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असतील.
प्रिंट आणि स्वाक्षरी अनिवार्य
हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. तसेच त्या प्रवेशपत्रावर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांची असेल.
माहिती तपासणी करा, चूक असल्यास दुरुस्तीची संधी
प्रवेशपत्रावरील नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून दुरुस्ती अर्ज सादर करू शकतात. यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही.
परीक्षा दरम्यान हॉल तिकीट अनिवार्य
परीक्षेच्या काळात हॉल तिकीट सोबत ठेवणे अत्यावश्यक आहे. योग्य माहिती असलेले प्रवेशपत्र वेळेत मिळाल्यास परीक्षेची तयारी अधिक सुरळीत होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी विलंब न करता हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची तपासणी, प्रिंट आणि आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

