तुमचा इंटरनेट डेटा चालू असूनही, व्हॉट्सॲपवर येणाऱ्या मेसेजसाठी फक्त सिंगल टिक दिसावी, असं तुम्हाला वाटतं का? व्हॉट्सॲपच्या प्रॉक्सी सेटिंगमध्ये एक छोटा बदल करून तुम्ही ऑनलाइन असूनही ऑफलाइन असल्यासारखं दाखवू शकता आणि आपलं ऑनलाइन स्टेटस लपवू शकता.
आजकाल इंटरनेटशिवाय आपलं पानही हलत नाही, अशी परिस्थिती आहे. काही लोक तर एकवेळ जेवण सोडतील, पण स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत. अशात थोडावेळ जरी नेट गेलं, तरी अनेकांचा जीव कासावीस होतो. इतके आपण सगळेच फोन आणि इंटरनेटच्या आहारी गेलो आहोत.
व्हॉट्सॲपवर सिंगल टिकचा खेळ
अनेकदा आपण काहीतरी महत्त्वाचं काम करत असतो, व्हिडीओ बघत असतो किंवा व्हॉट्सॲपवर दुसऱ्या कुणाशीतरी बोलत असतो. त्यावेळी इंटरनेट चालू ठेवावंच लागतं. अशावेळी जर कुणी मेसेज केला, तर लगेच डबल टिक दिसते. यावरून तुम्ही ऑनलाइन आहात किंवा तुमचं नेट चालू आहे, हे समोरच्याला लगेच कळतं. मेसेज वाचला हे कळू नये म्हणून अनेकजण 'ब्लू टिक' बंद करतात, 'लास्ट सीन' सुद्धा लपवतात. असे अनेक 'चोर' आपल्या आजूबाजूला आहेत.
तुम्हीही असं करून बघा
पण हे सगळं करूनही डबल टिकमुळे तुम्ही ऑनलाइन असल्याचं कळतंच. 'अरे यार, यावर काही उपाय नाही का?' असं तुम्हाला वाटत असेल, तर काळजी करू नका. कारण तुमच्या अशा सगळ्या 'चोर' कामांसाठी स्मार्टफोन कंपन्यांनी काही ना काही सोय करून ठेवलेली असतेच. मग नेट चालू असतानाही, तुम्ही व्हिडीओ बघत असलात तरी, व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणाऱ्याला फक्त सिंगल टिक दिसावी आणि त्याला वाटावं की तुमचं नेट बंद आहे, असं करता येईल का? तर हो, नक्कीच करता येतं.
त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे...
- सर्वात आधी आपलं व्हॉट्सॲप उघडा.
- वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- 'सेटिंग्ज' (Settings) ऑप्शन निवडा.
- खाली स्क्रोल केल्यावर 'स्टोरेज अँड डेटा' (Storage and Data) दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर 'प्रॉक्सी' (Proxy) ऑप्शनवर क्लिक करा.
- 'यूज प्रॉक्सी' (Use Proxy) ऑप्शन बंद असेल, तर ते चालू करा.
- तिथे तुम्हाला एक नंबर टाकायला जागा दिसेल. तिथे 1.1.1.1 असं टाइप करा.
- खाली असलेल्या हिरव्या टिकवर (OK) क्लिक करून सेव्ह करा.
- तुमचं काम झाल्यावर आणि तुम्हाला परत नॉर्मल डबल टिक हवी असेल, तर 'यूज प्रॉक्सी' पुन्हा ऑन करा. असं केल्यावर 1.1.1.443 हा ऑप्शन आपोआप सुरू होईल आणि मेसेज पुन्हा नॉर्मल येण्यास सुरुवात होईल.
