Iron Deficiency : शरीरात लोहाची कमतरता, कसे ओळखाल?, 'ही' आहेत 6 लक्षणे
बऱ्याच लोकांमध्ये लोहाची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. शरीरात लोहाची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवते. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
16

Image Credit : Getty
त्वचा फिकट होणे -
शरीरात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यावर त्वचा फिकट दिसू लागते. यामुळे त्वचेची नैसर्गिक चमकही कमी होऊ शकते.
26
Image Credit : Getty
श्वास घेण्यास त्रास होणे -
शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवतो. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
36
Image Credit : Getty
डोकेदुखी होणे -
मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्यास रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.
46
Image Credit : Getty
थकवा जाणवणे -
शरीरात पुरेसे लोह नसल्यास, ऊतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक हिमोग्लोबिन तयार होत नाही. यामुळे उर्जेची कमतरता जाणवते.
56
Image Credit : our own
थंडी वाजणे -
लोहाच्या कमतरतेमुळे हात आणि पाय नेहमी थंड पडल्यासारखे वाटतात.
66
Image Credit : Pixabay
पायांमध्ये वेदना होणे -
गुडघे आणि तळपायांमध्ये सतत वेदना होत असल्यास लक्ष द्या. हे लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.