बहुतांश दुकानदार ग्राहकांकडून नाणी घेण्यास नकार देतात. काही ठिकाणी 10 रुपयांचे नाणे घेतले जात नाही. याआधी 1 रुपयाचे नाणे देखील स्विकारले जात नव्हते.
एखादा दुकानदार नाणी घेण्यास नकार देत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार करू शकता.
आरबीआय जोवर नाण्यांचे चलन बंद करत नाही तोवर दुकानदारांना नाणी स्विकारावी लागतील. अन्यथा दुकानदाराच्या विरोधात कारवाई होऊ शकते.
दुकानदाराने तुमच्याकडील नाणी घेण्यास नकार दिल्यास त्याला कायद्यामधील नियम काय आहे हे समजावून सांगा.
दुकानदाराने नाणी न घेण्यासाठी वाद घातल्यास त्याच्या विरोधात तक्रार करू शकता.
तुमच्याकडील नाणी न घेतल्यास आरबीआयची अधिकृत वेबसाइट अथवा टोल फ्री क्रमांक 144040 वर तक्रार करु शकता.
दुकानदाराने नाणी घेण्यास नकार दिल्यास त्याच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ शको. कारण असे करणे राष्ट्रीय मुद्रेचा अपमान केल्यासारखे होते.