घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सरकारकडून टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाते. मुख्य अनुदानासोबतच, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशनमधूनही अतिरिक्त मदत मिळते.

सरकारच्या वतीने सर्वांसाठी घरे बांधण्यात येतील अशी घोषणा करण्यात येत असते. सर्वांसाठी घरे ही घरकुल योजनेतून बांधण्यात येतात याबद्दलची माहिती आपल्याला असेल. पण योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. पण हे अनुदान किती असते आणि ते कोणत्या टप्प्यांत मिळते, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

घर बांधण्यासाठी टप्याटप्याने किती अनुदान दिले जाते? 

घरकुल योजनेत मिळणारे अनुदान हे चार टप्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली जाते. घरकुलला प्रशासकीय मदत मिळाल्यानंतर घराची सुरुवात करताना १५,००० रुपयांचा पहिला हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ७०,००० रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला जातो.

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तपासणी करूनच हा निधी दिला जातो. घराचे छत बसवण्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ३०,००० रुपयाला तिसरा हप्ता जमा केला जातो. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याची अंतिम तपासणी झाल्यानंतर ५,००० रुपयांचा शेवटचा हप्ता दिला जातो. या चार हप्त्यांत मिळून लाभार्थ्याला एकूण ₹१,२०,००० चे मुख्य अनुदान मिळते.

अतिरिक्त अनुदान आणि एकूण मदत किती दिली जाते? 

घरकुल योजनेच्या मुख्य अनुदानाशिवाय लाभार्थींना इतर सरकारी योजनांमधून पूरक मदत मिळते आणि त्यांना घर बांधणे सोपे जाते. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घरकुल लाभार्थ्यांना ९० दिवसांच्या कामासाठी ₹२६,७३० मिळतात. हे पैसे घर बांधकामासाठी मजूर म्हणून केलेल्या कामाबद्दल दिले जातात.

स्वच्छ भारत मिशनमधून किती रुपये मिळतात? 

स्वच्छ भारत मिशनमधून शौचालयाच्या बांधकामासाठी १२,००० रुपयांचे अनुदान दिले जाते. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आता ५०,००० चे वाढीव अनुदान दिले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना एकूण ₹२,०८,७३० रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकेल. यामुळे लाभार्थ्यांना आणखी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.