MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Housing Society Rules: हाऊसिंग सोसायटी कमिटीचे सदस्यत्व नक्की कधी रद्द होते? पाहा काय सांगतो सहकार कायदा!

Housing Society Rules: हाऊसिंग सोसायटी कमिटीचे सदस्यत्व नक्की कधी रद्द होते? पाहा काय सांगतो सहकार कायदा!

Housing Society Rules: सहकार कायद्यानुसार, राजीनामा, शेअर्सचे हस्तांतरण, मृत्यू, कायदेशीर हकालपट्टी यांसारख्या विशिष्ट कारणांमुळे हाऊसिंग सोसायटीचे सभासदत्व संपुष्टात येते. सभासदत्व रद्द झाल्यास, त्या व्यक्तीचे व्यवस्थापन समितीमधील पदही रिक्त होते. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 25 2026, 03:46 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
हाऊसिंग सोसायटी कमिटीचे सदस्यत्व नक्की कधी रद्द होते?
Image Credit : Twitter

हाऊसिंग सोसायटी कमिटीचे सदस्यत्व नक्की कधी रद्द होते?

मुंबई: अनेकदा हाऊसिंग सोसायटीमध्ये कमिटी सदस्यांचे अधिकार आणि त्यांच्या सदस्यत्वाची मुदत यावरून वाद निर्माण होतात. सहकार कायद्यानुसार, काही विशिष्ट परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे सोसायटीमधील सभासदत्व आपोआप संपुष्टात येते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कमिटी सदस्यत्वावरही होतो. सोसायटीच्या नियमावलीनुसार नक्की कोणत्या कारणांमुळे सदस्यत्व रद्द होऊ शकते, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

25
१. कोणत्या परिस्थितीत सभासदत्व संपुष्टात येते?
Image Credit : Twitter

१. कोणत्या परिस्थितीत सभासदत्व संपुष्टात येते?

गृहनिर्माण संस्थेच्या नियमांनुसार खालील कारणांमुळे सभासदत्व रद्द मानले जाते.

राजीनामा: जर सभासदाने स्वतःहून दिलेला राजीनामा सोसायटीच्या कमिटीने अधिकृतपणे मंजूर केला असेल तर.

शेअर्सचे हस्तांतरण: संबंधित सभासदाने आपला भागदाखला (Share Certificate) दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कायदेशीररीत्या ट्रान्सफर केल्यास.

दुर्दैवी मृत्यू: सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांचे प्राथमिक सभासदत्व संपते.

कायदेशीर हकालपट्टी: जर संस्थेच्या सर्वसाधारण सभेने (AGM) एखाद्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर केला आणि त्याला उप/सहाय्यक निबंधकांनी कलम ३५ अंतर्गत मान्यता दिली असेल तर.

संस्था विसर्जन: जर सभासद एखादी ट्रस्ट, कंपनी किंवा फर्म असेल आणि ती संस्थाच विसर्जित झाली किंवा तिची नोंदणी रद्द झाली असेल तर. 

Related Articles

Related image1
Samsung E-Bike : एकदा चार्ज करा आणि 380 किलोमीटर चालवा, सॅमसंगने आणली जबरदस्त इलेक्ट्रिक सायकल
Related image2
Cooling Hack: पंख्यासमोर हि वस्तू ठेवल्यास सगळं घर होईल थंड, वस्तू नेमकी आहे तरी काय?
35
२. कमिटी सदस्यत्वावर होणारा परिणाम
Image Credit : Twitter

२. कमिटी सदस्यत्वावर होणारा परिणाम

सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचा (Management Committee) सदस्य होण्यासाठी त्या व्यक्तीचे 'सभासद' असणे ही प्राथमिक अट आहे. त्यामुळे, जर वरीलपैकी कोणत्याही कारणाने सभासदत्व रद्द झाले, तर त्या व्यक्तीचे कमिटीमधील पदही आपोआप रिक्त होते. 

45
३. सहसभासद आणि सहयोगी सभासदांचे काय?
Image Credit : Twitter

३. सहसभासद आणि सहयोगी सभासदांचे काय?

मुख्य सभासदाचे सभासदत्व संपले की, त्यांच्या आधारावर मिळालेले सहसभासद (Joint Member) किंवा सहयोगी सभासदांचे (Associate Member) सदस्यत्वही त्वरित रद्द होते. याव्यतिरिक्त, त्यांनी स्वतः राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला तरीही त्यांचे सदस्यत्व संपुष्टात येते. 

55
४. नोंदवहीतील बदल आणि निबंधकांचे अधिकार
Image Credit : our own

४. नोंदवहीतील बदल आणि निबंधकांचे अधिकार

सभासदत्व संपल्यानंतर सोसायटीने 'सभासद नोंदवही'तून (I & J Register) त्या व्यक्तीचे नाव कमी करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. जर सोसायटीने ही प्रक्रिया टाळली, तर सहकार कायद्याच्या कलम २५ (अ) नुसार उप किंवा सहाय्यक निबंधक सोसायटीला नाव काढण्याचे आदेश देऊ शकतात.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Health Alert: आरोग्यासाठी सर्वात घातक 5 बिस्किट्स, खाण्यापूर्वी जाणून घ्या!
Recommended image2
Health Tips: उन्हाळ्यात गरम की थंड, कोणतं पाणी आरोग्यासाठी असतं फायद्याचं?
Recommended image3
Jewellery: लेकीला द्या 1 हजारातील हे हटके भारी सिल्व्हर इअररिंग्स!
Recommended image4
Mobile Phone: तुमचा फोन स्लो झालाय? या 5 टिप्सनी फोन बनवा पुन्हा सुपरफास्ट!
Recommended image5
कमी वजनाचे गोल्ड हुप्स, ५ वर्षांपेक्षा जास्त बेबी डिझाइन्स घ्या पाहून
Related Stories
Recommended image1
Samsung E-Bike : एकदा चार्ज करा आणि 380 किलोमीटर चालवा, सॅमसंगने आणली जबरदस्त इलेक्ट्रिक सायकल
Recommended image2
Cooling Hack: पंख्यासमोर हि वस्तू ठेवल्यास सगळं घर होईल थंड, वस्तू नेमकी आहे तरी काय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved