Honor Smartphone प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Honor लवकरच 14,000mAh बॅटरीचा एक नवीन फोन आणण्याच्या तयारीत आहे. जर हे खरं ठरलं, तर स्मार्टफोनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बॅटरी असेल. सध्या हा फोन सुरुवातीच्या टप्प्यात असून, एकदा चार्ज केल्यावर तो तीन ते चार दिवस सहज चालेल, असा अंदाज आहे.

 स्मार्टफोन विश्वात सध्या बॅटरी बॅकअप वाढवण्याची मोठी स्पर्धा सुरू आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड 'ऑनर' (Honor) आता या स्पर्धेत एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार, Honor सध्या तब्बल 14,000mAh क्षमतेची अक्राळविक्राळ बॅटरी असलेला नवीन स्मार्टफोन विकसित करत आहे. जर हा दावा खरा ठरला, तर जागतिक बाजारपेठेतील स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी ठरेल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ही माहिती चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर प्रसिद्ध टिपस्टर 'डिजिटल चॅट स्टेशन' ने शेअर केली आहे. त्याने थेट कंपनीचं नाव घेतलं नसलं तरी, Honor चा उल्लेख करणारा एक इमोजी वापरला आहे. त्यामुळे हा नवीन फोन Honor चाच असू शकतो, असा अंदाज टेक विश्वातून व्यक्त होत आहे.

टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, या शक्तिशाली स्मार्टफोनचे वजन सुमारे २२० ग्रॅमच्या आसपास असणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Honor X80 Pro Max चे वजन २०३ ग्रॅम आहे. एवढ्या अवाढव्य क्षमतेची बॅटरी असूनही जर कंपनीने फोनचे वजन इतके मर्यादित ठेवले, तर ते स्मार्टफोन तंत्रज्ञानातील एक मोठे यश मानले जाईल.

एकदा चार्ज केला की ४ दिवस सुट्टी!हा फोन लाँच झाल्यास तो स्वतःच्याच ११,०००mAh बॅटरी असलेल्या Honor X80 Pro Max चा विक्रम मोडीत काढेल. सामान्य वापरामध्ये हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर किमान ३ ते ४ दिवस आरामात चालेल, असा अंदाज आहे.

गेल्या काही काळापासून स्मार्टफोन कंपन्या 5,000mAh किंवा 6,000mAh च्या पारंपरिक बॅटरी क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या बॅटरीकडे वळत आहेत. उदाहरणार्थ, Realme P4 Power 5G मध्ये 10,001mAh बॅटरी होती, तर Honor च्या Win आणि Win RT मॉडेल्समध्ये 10,000mAh बॅटरी देण्यात आली होती.

जर 14,000mAh बॅटरीचा हा नवीन फोन प्रत्यक्षात आला, तर स्मार्टफोन बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये हे एक मोठं पाऊल ठरेल. मात्र, कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.