Health Tips : हृदयरोगाच्या या महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, रहा सावध
Health Tips : उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, धूम्रपान, मानसिक ताण यांसारख्या गोष्टी हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात. त्याअनुषंगाने हृदयरोगाची काही लक्षणे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पाहूया कोणती लक्षणे आहेत -

हृदयरोगाच्या या महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
हृदयरोगाची काही लक्षणे जाणून घेऊया.
छातीत दुखणे
छातीत दुखणे, अस्वस्थता, छातीवर दाब जाणवणे ही हृदयरोगाची सामान्य आणि महत्त्वाची लक्षणे आहेत.
हृदयाचे अनियमित ठोके
हृदयाचे अनियमित ठोके हे देखील हृदयरोगाचे लक्षण असू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे
श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे हे देखील हृदयरोगाचे एक प्रमुख लक्षण आहे.
खांदेदुखी
खांदेदुखी आणि खांद्यापासून हातापर्यंत पसरणारी वेदना ही हृदयरोगाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. सामान्यतः ही वेदना डाव्या हाताला जाणवते.
पाय आणि घोट्याला सूज
जेव्हा हृदय योग्यरित्या रक्त पंप करत नाही, तेव्हा पाय तसेच घोट्याला सूज येते आणि पाय दुखतात.
मान आणि जबड्यात वेदना
छातीपासून सुरू होऊन वरच्या दिशेने पसरणारी वेदना मान आणि जबड्यात जाणवते. अशा वेदना हृदयरोगाचे लक्षण असू शकतात.
चक्कर येणे
जेव्हा हृदयाच्या कार्यात अडथळा येतो, तेव्हा चक्कर आणि तीव्र थकवा जाणवतो.
लक्षात ठेवा:
वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान न करता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच रोगाची पुष्टी करा.

