Health care: झोपून उठल्यावर किंवा उभे राहिल्यावर चक्कर येते का? दुर्लक्ष करू नका
Health care : उभे राहिल्यावर किंवा झोपून उठल्यावर अचानक चक्कर येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही चक्कर का येते आणि ते टाळण्याचे उपाय काय आहेत, याबद्दल या लेखात जाणून घेऊया.

चक्कर येण्याची कारणे
काही लोक झोपेतून उठताना किंवा बराच वेळ एकाच जागी बसून उठल्यावर चक्कर येत असल्याची तक्रार करतात. 65 वर्षांवरील लोकांना याचा जास्त धोका असतो. काही तरुणांमध्येही ही समस्या दिसून येते. रक्तदाबातील बदलांमुळे हे घडते. हे टाळण्यासाठी काही सोपे उपाय या लेखात पाहूया.
सावकाश उठा
अंथरुणातून किंवा खुर्चीवरून अचानक उठल्यास पायांकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्ताचा वेग वाढतो. यामुळे चक्कर येऊ शकते. त्यामुळे नेहमी हळू आणि सावकाश उठावे.
काही औषधांचे परिणाम
जर तुम्ही दीर्घकाळापासून काही औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांचा डोस कमी करा किंवा गरज नसल्यास औषधे पूर्णपणे बंद करा.
जेवण विभागून खा
एकाच वेळी पोटभर जेवल्याने एक प्रकारची सुस्ती आणि चक्कर येऊ शकते. त्यामुळे जेवण विभागून, म्हणजे थोड्या-थोड्या वेळाने खावे. यामुळे चक्कर आणि मरगळ टाळता येते.
भरपूर पाणी प्या
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्तदाबात बदल होतो. यामुळे अंथरुणातून उठताना किंवा बसून उभे राहताना चक्कर येते. हे टाळण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या.
व्यायाम करा
चक्कर येणे टाळण्यासाठी व्यायाम करणे हा एक उत्तम पर्याय आहे. व्यायामामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. पण झोपेतून उठल्याबरोबर व्यायाम करू नका. थोडा वेळ वॉर्म-अप करून मगच व्यायाम सुरू करा.
या गोष्टी सोबत ठेवायला विसरू नका!
कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. उन्हात जाताना नेहमी छत्री वापरा. तसेच, सोबत पाण्याची बाटली नेहमी ठेवा. विशेषतः जास्त वेळ उभे राहून काम करणे टाळा.

