Pixel 10 Price Drop गुगलचा प्रीमियम स्मार्टफोन Pixel 10 आता ॲमेझॉनवर तब्बल १६,००० रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटमध्ये मिळतोय. बँक आणि एक्सचेंज ऑफर्स वापरल्यास हा फ्लॅगशिप फोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

Pixel 10 Price Drop गुगलचा प्रीमियम स्मार्टफोन, Pixel 10, खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. हा फोन आता मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. भारतात ७९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा फ्लॅगशिप फोन सध्या ॲमेझॉनवर १६,००० रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह विकला जात आहे. बँक ऑफर्स आणि एक्सचेंजचा फायदा घेतल्यास ग्राहकांना आणखी बचत करता येईल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

smartphone ॲमेझॉनवर सध्या गुगल पिक्सल १० ची किंमत ६३,७७० रुपये आहे. ही किंमत लाँच प्राईसपेक्षा १६,२२९ रुपयांनी कमी आहे. याशिवाय, HSBC क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास ३,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. त्यामुळे फोनची प्रभावी किंमत ६०,७७० रुपयांपर्यंत खाली येईल.

ज्यांना एकदम पूर्ण रक्कम भरायची नाही, त्यांच्यासाठी ॲमेझॉनने नो-कॉस्ट EMI चा पर्यायही दिला आहे. दरमहा २,२४२ रुपयांपासून EMI सुरू होते. तसेच, जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून नवीन फोन घेतल्यास बायबॅक योजनेतून ३५,९०० रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदा मिळू शकतो. अर्थात, एक्सचेंजची किंमत तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.

फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, गुगल पिक्सल १० मध्ये कंपनीचा सर्वात नवीन Tensor G5 प्रोसेसर आहे. यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज मिळतं. फोनमध्ये ४,९७०mAh क्षमतेची बॅटरी असून ती 30W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात ६.३ इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे, जो ३,००० निट्सपर्यंत ब्राईटनेस देतो. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि १०.८ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी १०.५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

टेक तज्ज्ञांच्या मते, ज्यांना एक चांगला अँड्रॉइड अनुभव, जबरदस्त कॅमेरा परफॉर्मन्स आणि AI फीचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी पिक्सल १० एक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या ऑफर्स पाहता, फ्लॅगशिप स्मार्टफोन सेगमेंटमधील ही एक आकर्षक डील मानली जात आहे.