Gold Silver Prices Today : सोने-चांदी आज स्वस्त झालं आहे. सोने दर घसरला असून चांदीचा भावही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या घसरणीमागे तज्ज्ञांकडून महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत.

मुंबई : सोने-चांदी दरात होणारी घसरण आजही कायम आहे. आज गुरुवारी सोन्याचा दर, तसंच चांदीचा भावही उतरला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीची किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

चांदीचा दर किती?

एमसीएक्सवर चांदीचा भाव बुधवारी २,२०,६२० रुपये होता. मात्र गुरुवारी चांदीचा भाव घसरला. गुरुवारी चांदीचा दर २,१८,९४९ रुपये प्रति किलो इतका आहे. त्यामुळे गुरुवारी चांदीचा भाव १६७१ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

आजचा सोन्याचा दर काय?

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,४३,५८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ४१० रुपयांनी कमी झाला आहे. या घसरणीसह २२ कॅरेट सोन्याचा मुंबईतील आजचा भाव १,३१,००० रुपये १० ग्रॅम इतका आहे.

मुंबईत आज १८ कॅरेट सोन्याचा भावही घसरला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर आज ३८० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आजचा १८ कॅरेटचा भाव १,०६,६६५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

सोने दरातील घसरण का होतेय?

इराण आणि अमेरिका या दोन देशांतील वाढता संघर्ष, फेडरल बँकांचे व्याजदर वाढण्याची चिंता अशी अनेक कारणं सोने दरातील घसरणीमागे सांगितली जात आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकदार गोल्ड ईटीएफमधून आपला पैसा काढत आहेत. तो पैसा रोख रक्कम किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवला जात आहे. त्यामुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण होतो आहे. अशात सोने दरात घसरण होत आहे.

दुसरीकडे अमेरिका आणि इराण या दोन देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दरही वाढत आहेत. त्याचा परिणामही भारतातील व्यवहारांवर होताना दिसतो. सोनं हा गुंतवणुकासाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र वाढत्या व्याजदराच्या वाढीच्या भीतीने सोन्याची मागणी कमी होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या अनेक घडामोडींचा सोने-चांदी दरावर परिणाम होऊन दर कमी झाला आहे.