MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Gold Rate Today : दसरा-दिवाळीपर्यंत सोन्याचा दर काय राहणार? काय सांगतात विश्लेषक? जाणून घ्या

Gold Rate Today : दसरा-दिवाळीपर्यंत सोन्याचा दर काय राहणार? काय सांगतात विश्लेषक? जाणून घ्या

सोने-चांदीचे दर: १ सप्टेंबरला सोने-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की येणाऱ्या काळात हे आणखी महाग होऊ शकते. त्यामुळे सणासुदीला सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना धक्का बसू शकतो. जाणून घ्या किंमत कुठपर्यंत जाईल. 

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 01 2025, 01:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सोने चांदीचे नवे दर
Image Credit : Gemini

सोने चांदीचे नवे दर

सप्टेंबर 2025 च्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, सोमवारी 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 2,404 रुपयांनी वाढून 1,04,792 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याची किंमत 76,162 रुपये होती. तेथून आजवर 28,630 रुपयांची उसळी घेत सोन्याने विक्रमी पातळी गाठली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
चांदीचे दर वाढले
Image Credit : PINTEREST

चांदीचे दर वाढले

सोबतच चांदीचे दरही आकाशाला भिडले आहेत. 1 सप्टेंबर रोजी चांदीचा भाव 5,678 रुपयांनी वाढून 1,23,250 रुपये प्रति किलो झाला. या वर्षाच्या सुरुवातीस सुमारे 86,000 रुपये असलेला चांदीचा दर आता तब्बल 37,000 रुपयांनी वाढून विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

Related Articles

Related image1
Manoj Jarange Patil : मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल, CSMT कडे जाणारे रस्ते बंद, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद
Related image2
Chandra Grahan 2025 : श्राद्धाच्या पहिल्या दिवशी ग्रहण, पिंडदान-तर्पण कधी करायचे? जाणून घ्या
35
सोने-चांदी किती महागेल?
Image Credit : ChatGPT

सोने-चांदी किती महागेल?

सणासुदीचा हंगाम जवळ आल्यामुळे किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये दशहरा–दिवाळी असल्याने खरेदीचा उत्साह वाढेल. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणांमुळे आणि जागतिक राजकीय तणावांमुळे सोन्याला स्थैर्य मिळत आहे. त्यामुळे डिसेंबर 2025 पर्यंत सोने 1.08 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 1.30 लाख रुपये प्रति किलो इतकी महाग होऊ शकते.

45
सोने महागण्याची कारणे
Image Credit : Gemini

सोने महागण्याची कारणे

  1. रशिया–युक्रेन युद्धामुळे गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी सोने खरेदी करत आहेत.
  2. व्यापारयुद्ध आणि टॅरिफचा धोका यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत.
  3. चीन आणि रशियाने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्याने मागणी वाढली आहे.
  4. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण किंमती वाढवणारी ठरली आहे.
  5. वाढती महागाई आणि कमी व्याजदरांमुळे सोने आकर्षक ठरत आहे.
55
आता सोने घ्यायचे का?
Image Credit : Gemini

आता सोने घ्यायचे का?

तज्ज्ञांच्या मते, सध्याचा काळ खरेदीसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण सणासुदीपर्यंत किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अल्पकालीन गुंतवणूकदारांनी लगेच खरेदीचा विचार करावा, तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी सर्टिफाईड गोल्डमध्ये गुंतवणूक करणे अधिक लाभदायक राहील.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Second Hand Mobile Business : सेकंड हँड फोनची वाढती डिमांड, या बिझनेसमध्ये किती फायदा?
Recommended image2
Mutual Fund SIP : फक्त २ हजार रुपये गुंतवा आणि २ कोटींचे मालक व्हा, ही ट्रिक माहितीये का?
Recommended image3
Old Bank Account : २ वर्षे बँक खातं वापरलं नाही? मग तुमच्या पैशांचं काय होतं?
Recommended image4
Car Black Box: कार अपघातानंतर आता काहीच लपवता येणार नाही, 'ब्लॅक बॉक्स' उघड करणार सत्य!
Recommended image5
Kitchen Tips: करपलेलं चहाचं भांडं नव्यासारखं चमकेल; फक्त ही सोपी ट्रिक वापरा!
Related Stories
Recommended image1
Manoj Jarange Patil : मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल, CSMT कडे जाणारे रस्ते बंद, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद
Recommended image2
Chandra Grahan 2025 : श्राद्धाच्या पहिल्या दिवशी ग्रहण, पिंडदान-तर्पण कधी करायचे? जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved