- Home
- Utility News
- Gold Silver Rate : मध्यपूर्वेतील तणावाचा फटका, स्वस्त झालं म्हणून आनंद साजरा करण्याआधीच सोनं पुन्हा महागलं
Gold Silver Rate : मध्यपूर्वेतील तणावाचा फटका, स्वस्त झालं म्हणून आनंद साजरा करण्याआधीच सोनं पुन्हा महागलं
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा चिंतेचा ठरू शकतो. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते, पण आता ते पुन्हा वाढू लागले आहेत. मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदार सावध झालेत, ज्यामुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे.

हैदराबादमध्ये आजचे सोन्याचे दर
हैदराबादमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५४० रुपयांनी वाढून १,४३,२९० रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ५०० रुपयांनी वाढून १,३१,३५० रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे ५१० रुपयांनी वाढून १,०७,५७० रुपयांवर गेला आहे. गेल्या आठवड्यात दर घसरल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला होता. पण या आठवड्यात चित्र पुन्हा बदललं आहे. तुम्ही जर दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर हे वाढलेले दर नक्की तपासा.

सोन्याचे दर का वाढत आहेत?
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि सौदी अरेबियावरील हुथी बंडखोरांच्या हल्ल्याच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. अशा अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित पर्याय मानतात, त्यामुळे सोन्याची मागणी वाढते.
दुसरीकडे, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीपूर्वी बाजार सावध आहे. व्याजदराचे संकेत आणि डॉलरच्या मूल्यातील बदल यामुळेही दर ठरतात.
नुकतेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस ४,००० डॉलरच्या पुढे गेले आहे. देशांतर्गत बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति तोळा ४,००० रुपयांनी घसरला होता, पण आता तो पुन्हा वाढतोय.
चांदीचा आजचा भाव काय?
सोन्यासोबतच ग्राहक चांदीच्या दरांवरही लक्ष ठेवून आहेत. हैदराबाद, विजयवाडा आणि विशाखापट्टणममध्ये एक किलो चांदीचा दर २,२०,००० रुपये इतका आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्येही चांदी याच दराने विकली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि डॉलरच्या मूल्यानुसार सोने-चांदीचे दर सतत बदलत असतात. त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी स्थानिक सराफा बाजारात ताजे दर तपासून घ्यावेत. यावर घडणावळ (मेकिंग चार्जेस) आणि कर वेगळे लागू शकतात हे लक्षात ठेवा.
