Reduce Belly Fat : साखरयुक्त स्नॅक्स पोटावरील चरबीसाठी हानिकारक आहेत. ग्रीक योगर्ट चांगले आहे. बेरीजसोबत ग्रीक योगर्ट खाणे अधिक उत्तम आहे. प्रोटीन आणि प्रोबायोटिक्समुळे पोट भरलेले राहते.

Reduce Belly Fat : वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी पोटावरील चरबी कमी करणे हे नेहमीच एक मोठे आव्हान असते. व्यायाम आणि निरोगी आहार पोटावरील चरबी कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सौरभ सेठी यांनी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही उत्तम पदार्थ आणि पेयांबद्दल माहिती दिली आहे.

ते रक्तातील साखरेची पातळी वाढवतात -

फळांचा रस पोटावरील चरबीसाठी हानिकारक आहे. त्याऐवजी संपूर्ण फळे खाणे चांगले आहे. बेरीसारखी फळे तर सर्वोत्तम आहेत, असे डॉ. सेठी सांगतात. रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खाणे आरोग्यासाठी चांगले नाही, कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढवतात आणि चरबी जमा होण्यास प्रोत्साहन देतात. त्याऐवजी, ओट्स, स्टील-कट ओट्स यांसारखी फायबरयुक्त आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असलेली धान्ये पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. या पदार्थांमधील फायबर साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे दुष्परिणाम कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

साखरयुक्त स्नॅक्स पोटावरील चरबीसाठी हानिकारक आहेत. ग्रीक योगर्ट खाणे चांगले आहे. बेरीजसोबत ग्रीक योगर्ट खाणे अधिक उत्तम आहे. प्रोटीन आणि प्रोबायोटिक्समुळे पोट भरलेले राहते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे सौरभ सेठी यांनी सांगितले.

अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ, विशेषतः प्रक्रिया केलेले मांस, पोटावरील चरबीवर हानिकारक परिणाम करतात, असा इशारा डॉ. सेठी देतात. अंडी, सॅल्मन आणि सार्डिन यांसारखे फॅटी मासे आहारात समाविष्ट केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. एनर्जी ड्रिंक्स पोटावरील चरबीसाठी हानिकारक आहेत. ब्लॅक टी पिणे चांगले आहे आणि ग्रीन टी तर त्याहूनही उत्तम आहे. चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक घटक वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

View post on Instagram