आतडे निरोगी ठेवायचे असतील तर फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स या दोन बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण भरपूर फायबर, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आढळतात. फायबरने समृद्ध असलेल्या या दोन बिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात.
आपल्या आरोग्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खूप चांगले असतात. आतडे, हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर महत्त्वाची भूमिका बजावते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी फायबर महत्त्वाचा घटक आहे. फायबरचे दोन प्रकार आहेत - विरघळणारे आणि न विरघळणारे.
फायबर आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देते. यामुळे शॉर्ट-चेन फॅटी ऍसिड तयार होतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी चांगले असतात.
फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स या दोन बियांमध्ये भरपूर फायबर असते. यामध्ये हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. फक्त 2 चमचे चिया सीड्समधून 10 ग्रॅम फायबर मिळते. प्रौढांना दररोज 25-38 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. चिया सीड्स वनस्पती-आधारित प्रथिने, अँटी-इंफ्लेमेटरी फॅट्स आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत.
दुसरी बी म्हणजे फ्लेक्स सीड. चिया सीड्स व्यतिरिक्त, शरीरातील फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी फ्लेक्स सीड्स हा एक चांगला मार्ग आहे. दोन चमचे फ्लेक्स सीड्समधून 7 ग्रॅम फायबर मिळते. काही पदार्थांमध्ये फ्लेक्स सीड्सची पावडर वापरली जाऊ शकते.
या बिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात, हृदयाच्या आरोग्यास मदत करतात आणि फायबर व हेल्दी फॅट्समुळे दैनंदिन ऊर्जा वाढवतात. चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्समध्ये सर्वाधिक फायबर असते. 2 चमचे चिया सीड्समध्ये 10 ग्रॅम आणि फ्लेक्स सीड्समध्ये 6 ग्रॅम फायबर असते.


