- Home
- Utility News
- Fastag Rule Change : १ एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! फक्त Fastag किंवा UPI चालणार; दंड टाळायचा असेल तर आधी वाचा
Fastag Rule Change : १ एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! फक्त Fastag किंवा UPI चालणार; दंड टाळायचा असेल तर आधी वाचा
Fastag Rule Change : १ एप्रिलपासून देशभरातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेस होणार असून, रोख व्यवहार बंद होतील. वाहनचालकांना आता फक्त Fastag किंवा UPI पेमेंटद्वारेच टोल भरावा लागेल, ज्यामुळे प्रवास वेगवान होऊन इंधनाची बचत होईल.

१ एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! फक्त Fastag किंवा UPI चालणार
मुंबई : तुम्ही रोज महामार्गावरून प्रवास करता? किंवा एप्रिलमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण १ एप्रिलपासून देशभरातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेस होणार आहेत. टोल नाक्यावर आता रोख पैसे चालणार नाहीत. फक्त Fastag किंवा UPI पेमेंट हेच पर्याय उपलब्ध असतील.
१ एप्रिलपासून काय बदलणार?
केंद्र सरकारने टोल प्रणालीत मोठा बदल जाहीर केला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. नव्या नियमानुसार
टोल प्लाझावर कॅश पेमेंट पूर्णपणे बंद
Fastag द्वारे स्वयंचलित टोल कपात
Fastag मध्ये अडचण असल्यास UPI स्कॅनरद्वारे पेमेंट
यापैकी कोणतीही डिजिटल सोय नसल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
कॅश बंद करण्यामागचं कारण काय?
आजही अनेक वाहनचालक Fastag असतानाही टोलवर रोख पैसे देतात. यामुळे
सुट्ट्या पैशांसाठी वेळ जातो
टोल नाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागतात
प्रवासाचा वेळ वाढतो
कॅश व्यवहार बंद केल्यामुळे वाहने न थांबता पुढे जातील, प्रवास वेगवान होईल आणि वारंवार ब्रेक-स्टार्ट न झाल्याने इंधनाचीही बचत होणार आहे.
‘नो-स्टॉप टोलिंग’कडे वाटचाल
सरकार सध्या देशातील २५ टोल प्लाझांवर नो-स्टॉप टोलिंग प्रणालीची चाचणी घेत आहे. या प्रणालीत
हाय-स्पीड कॅमेरे
आधुनिक सेन्सर्स
धावत्या वाहनाचा टोल आपोआप कापतील. भविष्यात टोल बूथ, बॅरियर किंवा थांबण्याची गरजच उरणार नाही. १ एप्रिलपासूनचा कॅशलेस निर्णय हा बॅरियर-फ्री टोलिंगकडे टाकलेलं पहिलं पाऊल मानलं जात आहे.
वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी?
१ एप्रिलपूर्वी हे नक्की करा
तुमच्या Fastag खात्यात पुरेशी शिल्लक ठेवा
मोबाईलमध्ये UPI अॅप आणि इंटरनेट सुरू ठेवा
Fastag नीट कार्यरत आहे की नाही, ते तपासा
डिजिटल पेमेंटची सोय नसल्यास दंड भरावा लागू शकतो किंवा काही ठिकाणी टोल नाक्यावरून परत पाठवले जाण्याची शक्यता आहे.

