MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • फक्त एक दिवस शिल्लक! 1 जानेवारीपासून सरकारी लाभ थांबू शकतात, शेतकऱ्यांनी ही 4 महत्त्वाची कामं तातडीने पूर्ण करा

फक्त एक दिवस शिल्लक! 1 जानेवारीपासून सरकारी लाभ थांबू शकतात, शेतकऱ्यांनी ही 4 महत्त्वाची कामं तातडीने पूर्ण करा

Agriculture News : वर्षाचा शेवटजवळ येताना शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपूर्वी 4 महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये आधार-पॅन लिंक करणे, रेशन कार्ड KYC अपडेट करणे, रब्बी पिकांसाठी विमा भरणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करणे यांचा समावेश आहे. 

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Dec 30 2025, 05:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शेतकऱ्यांनी ही 4 महत्त्वाची कामं तातडीने पूर्ण करा
Image Credit : Getty

शेतकऱ्यांनी ही 4 महत्त्वाची कामं तातडीने पूर्ण करा

मुंबई : डिसेंबर महिना संपायला अवघे काही तास उरले असून वर्षाचा शेवट अगदी जवळ आला आहे. 31 डिसेंबरपूर्वी काही अत्यावश्यक कामे पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना नव्या वर्षात आर्थिक फटका, दंड किंवा सरकारी योजनांचे लाभ गमवावे लागू शकतात. शेतीशी संबंधित तसेच वैयक्तिक कागदपत्रांशी निगडित काही महत्त्वाच्या योजनांसाठी शासनाने 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही कामे वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. 

25
1 जानेवारीपूर्वी कोणती कामे करणे बंधनकारक आहे?
Image Credit : Google

1 जानेवारीपूर्वी कोणती कामे करणे बंधनकारक आहे?

आधार–पॅन लिंक करणे

शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे. बँक व्यवहार, पीक विमा, अनुदान, कर्ज तसेच विविध सरकारी योजनांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. जर एखाद्या शेतकऱ्याने 1 ऑक्टोबर 2024 किंवा त्यापूर्वी आधार कार्ड काढले असेल आणि पॅनशी लिंक केले नसेल, तर 31 डिसेंबरनंतर पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.

पॅन निष्क्रिय झाल्यास

बँक व्यवहार अडचणीत येऊ शकतात

शेतमाल विक्रीची रक्कम अडकू शकते

अनुदान व सरकारी मदत मिळणे थांबू शकते

ही प्रक्रिया आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाईन करता येते. उशीर झाल्यास दंड आकारला जाऊ शकतो, त्यामुळे ही लिंकिंग तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. 

Related Articles

Related image1
तब्बल 40 कोटींची ऑफर नाकारणारा स्टार, मुलांसाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या
Related image2
Fitness Tips : जिममध्ये न जाताही रहा एक फिट, फक्त रोज फॉलो करा या सोप्या गोष्टी
35
रेशन कार्ड KYC अपडेट
Image Credit : social media

रेशन कार्ड KYC अपडेट

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबे सरकारी रेशनवर अवलंबून असतात. रेशन कार्डची KYC पूर्ण न केल्यास मोफत किंवा सवलतीचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे. जरी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून आत्ताच KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आधारशी लिंक असलेली रेशन KYC लवकर करून ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. 

45
पीक विमा भरणे
Image Credit : Asianet News

पीक विमा भरणे

शेतकऱ्यांसाठी सर्वात संवेदनशील बाब म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना.

रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे.

अवकाळी पाऊस, गारपीट, दंव किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा वेळी पीक विमाच शेतकऱ्यांचा आर्थिक आधार ठरतो.

पात्र शेतकऱ्यांनी बँक, CSC केंद्र किंवा ऑनलाईन माध्यमातून विमा प्रस्ताव वेळेत भरावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

55
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज
Image Credit : Google

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज

ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना मोठा दिलासा आहे. या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून, पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा अधिकृत पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. 

नवीन वर्षात कोणताही शासकीय लाभ अडू नये, दंड भरावा लागू नये किंवा आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी ही चारही कामे 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेत योग्य निर्णय घेतल्यास नव्या वर्षाची सुरुवात अधिक सुरक्षित आणि लाभदायक ठरू शकते.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
हँगओव्हर म्हंजी काय रं भाऊ? यातून लगेच बाहेर पडण्यासाठी 6 प्रभावी उपाय, 'हँगझायटी'ला करा बायबाय!
Recommended image2
Wife Psychology : नवऱ्याशी सतत भांडणाऱ्या बायकोबद्दल मानसशास्त्र काय सांगतं?
Recommended image3
Year End Discounts: फक्त दोन दिवस बाकी; टाटा, महिंद्रच्या गाड्यांवर लाखोंची बचत
Recommended image4
तब्बल 40 कोटींची ऑफर नाकारणारा स्टार, मुलांसाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या
Recommended image5
Simple Tricks To Fix Salty Curry : आमटीत मीठ जास्त झालंय? हे सोपे उपाय करा, चव होईल दुप्पट
Related Stories
Recommended image1
तब्बल 40 कोटींची ऑफर नाकारणारा स्टार, मुलांसाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या
Recommended image2
Fitness Tips : जिममध्ये न जाताही रहा एक फिट, फक्त रोज फॉलो करा या सोप्या गोष्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved