- Home
- Utility News
- Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'च्या नावाने फसवणूक, बनावट वेबसाईट आणि लिंकपासून सावध राहा!
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'च्या नावाने फसवणूक, बनावट वेबसाईट आणि लिंकपासून सावध राहा!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बनावट वेबसाइट आणि लिंक्सचा वापर करून महिलांची वैयक्तिक माहिती चोरी करण्याचा प्रयत्न होत आहे.

मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर बनावट वेबसाइट आणि लिंक्स व्हायरल होत आहेत. या बनावट लिंक्समुळे महिलांची वैयक्तिक माहिती, विशेषतः आधार क्रमांकाची चोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या वर्षी जून महिन्याचे पैसे बँक खात्यात जमा न झालेल्या काही महिलांना लक्ष्य केले जात आहे. 'तुमचे नाव अपात्र यादीत आहे का, हे तपासण्यासाठी या लिंकवर क्लिक करा' असे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, अशा लिंक्सवर क्लिक केल्यास तुमचा आधार क्रमांक आणि इतर माहिती मागितली जाते. त्यामुळे महिलांनी अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिकृत माहिती कुठे मिळेल?
'लाडकी बहीण योजने'ची कोणतीही अधिकृत वेबसाईट अपात्र ठरलेल्या महिलांची यादी प्रकाशित करत नाही. त्यामुळे कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेवू नका. या योजनेबद्दलची खरी आणि अधिकृत माहिती सरकारच्या अधिकृत पोर्टलवरच उपलब्ध आहे.
अपात्र ठरलेल्या महिला आणि कारण
गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. मात्र, तपासणीत आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही अनेक महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारने अशा २६.३४ लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे तुमचा अर्ज अपात्र ठरला असल्यास त्याची खात्री अधिकृत सरकारी स्रोतांकडूनच करून घ्या.
सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?
कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
'लाडकी बहीण योजने'साठी तुमचा आधार क्रमांक किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणत्याही वेबसाईटवर देऊ नका.
योजनेबद्दलची माहिती हवी असल्यास सरकारी किंवा विश्वसनीय स्रोतांचाच वापर करा.

