Marathi

लेकीला पगफेऱ्यात द्या मारवाडी कानातले, पाहा खास डिझाइन्स

लग्नानंतर मुलगी जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते, त्या पगफेऱ्याच्या कार्यक्रमात तिला काहीतरी खास भेट देण्याची प्रथा आहे. तुम्ही तिला सोन्याचे मारवाडी कानातले देऊ शकता.
Marathi

चेनसोबतची मारवाडी बाली

तुमच्या लाडक्या लेकीला तुम्ही पगफेऱ्याच्या कार्यक्रमात हे मारवाडी कानातले देऊ शकता. सुंदर कटिंग असलेली ही बाली आणि चेन डिझाइन एथनिक वेअरवर खूपच छान दिसेल.

Image credits: pinterest.com
Marathi

चौकोनी आकाराचे टॉप्स डिझाइन

रोजच्या वापरासाठी चौकोनी आकाराचे सोन्याचे कानातले एक उत्तम पर्याय आहेत. हे कानातले जाळीदार पॅटर्नमध्ये बनवले आहेत. तुम्ही हे 5 ग्रॅममध्ये सहज बनवून घेऊ शकता.

Image credits: pinterest.com
Marathi

मीनाकारी सोन्याचे कानातले

मारवाडी डँगलर्स इअररिंग्स पार्टी किंवा कार्यक्रमांसाठी सर्वोत्तम आहेत. या कानातल्यांमध्ये मीनाकारी काम केलेलं आहे. तुम्ही सोनाराला हे डिझाइन दाखवून सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता.

Image credits: pinterest.com
Marathi

पानाच्या आकाराचे मारवाडी कानातले

मारवाडी स्टाइलचे हे सोन्याचे कानातले पारंपरिक कलाकुसर आणि बारीक नक्षीकामाचा एक उत्तम नमुना आहेत. याचं पानांच्या आकाराचं डिझाइन खूप रॉयल लूक देतं. 

Image credits: pinterest.com
Marathi

मारवाडी झुमके

रोजच्या वापरासाठी हे झुमका डिझाइन अगदी परफेक्ट आहे. तुम्ही मारवाडी स्टाइलमध्ये हे झुमके सोन्यात बनवून घेऊ शकता. यात मध्ये-मध्ये मीनाकारी डिझाइनसुद्धा टाकू शकता.

Image credits: pinterest
Marathi

गोल्ड स्टड मारवाडी इअररिंग्स

हे गोल्ड स्टड इअररिंग्स फुलांच्या डिझाइनमध्ये बनवलेले आहेत. त्यांच्या मध्यभागी लावलेले पांढरे खडे त्यांना एक एलिगंट आणि शायनी लूक देतात. वजनाला हलके आणि सिंपल आहे.

Image credits: pinterest

Micro Earrings: चिमुकलीसाठी खास गोल्ड स्टड्स, १८ वर्षांनंतरही दिसेल स्टायलिश!

Blouse Tips: ब्रा न घालताही ब्लाउज दिसेल एकदम फिट, वापरून पाहा या 5 स्मार्ट टिप्स

Kashmiri Jhumka: लग्नाच्या सिझनला घाला हे झुमके, दिसा 'कश्मीर की कली'

Heavy Earrings: कानाची पाळी लोंबकळणार नाही, वजनदार झुमके घालण्याच्या ५ सोप्या ट्रिक्स