दररोज सकाळी लिंबू पाण्यात एक चमचा चिया सीड्स टाकून प्या, जाणून घ्या अनेक फायदे
दररोज सकाळी लिंबू पाण्यात एक चमचा चिया सीड्स टाकून प्यायल्याने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. चिया सीड्स पाण्यात भिजवल्यावर त्यांना जेलीसारखा पोत येतो. रिकाम्यापोटी घेतल्यावर यांचे अनेक फायदे होतात. कोणते ते या लेखात जाणून घेऊया…

लिंबू पाण्यात एक चमचा चिया सीड्स टाकून प्या, कारण जाणून घ्या
लिंबू पाण्यात चिया सीड्स टाकून प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात. भिजवल्यावर त्यांना जेलीसारखा पोत येतो. यात फायबर, ओमेगा-३, प्रथिने, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे पचन सुधारते.
आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते.
नाश्त्यात लिंबू-चिया सीड्स पेय घेतल्यास पचन सुधारते आणि पोट फुगणे कमी होते. चिया सीड्समुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता टळते. कारण त्यात भरपूर विरघळणारे फायबर असते.
लिंबू आणि चिया सीड्स शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.
लिंबातील सायट्रिक ॲसिडमुळे पोषक तत्वांचे शोषण वाढते. लिंबू आणि चिया सीड्स शरीराला हायड्रेटेड ठेवतात. सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने जास्त फायदा होतो.
चिया सीड्समध्ये फायबर भरपूर असते. यामुळे जास्त भूक लागत नाही.
दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी हे पेय प्या. चिया-लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकते आणि त्वचेसाठी चांगले असते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. फायबरमुळे जास्त भूक लागत नाही.
शरीरातील पाण्याची पातळी वाढवते आणि चरबी कमी करते.
रोज सकाळी हे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. चिया सीड्स भूक नियंत्रित करतात. लिंबू पाणी कॅलरीज कमी करते. हे पेय शरीराला हायड्रेट ठेवते आणि चरबी कमी करते.
मुरुमे आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-३ असतात. हे घटक वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात, सूज कमी करतात आणि कोलेजन वाढवतात. यामुळे त्वचा मऊ आणि तरुण दिसते. मुरुमे आणि सुरकुत्या कमी होतात.
चिया सीड्स लिंबू पाणी बनवण्याची पद्धत
रोज सकाळी एका कप पाण्यात एक चमचा चिया सीड्स आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण २० मिनिटे बाजूला ठेवा आणि नंतर प्या. रिकाम्या पोटी प्यायल्याने अधिक फायदा होतो.

