चिया सीड्सचा वापर वजन कमी करणे ते पचनसंस्था मजबूत करण्यासाठी केला जातो. पण काही पदार्थांसोबत चिया सीड्सचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याबद्दल जाणून घेऊया पुढे...
चिया सीड्समध्ये पोषण तत्त्वे भरपूर असतात. यामध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन, अँटी-ऑक्सिडेंट्स, मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम असते.
चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही गोष्टींसोबत याचे सेवन करणे टाळावे.
चिया सीड्सचे अधिक मसालेदार पदार्थांसोबत सेवन करणे टाळावे. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
चिया सीड्सचे कधीच खारट पदार्थांसोबत सेवन करु नये. लोणचे, सॉससह चिया सीड्स खाल्ल्यास आरोग्याचे नुकसान होईल.
चिया सीड्सचे सेवन ड्राय फ्रुट्स किंवा नट्ससोबत करू नये यामुळे आरोग्य बिघडले जाऊ शकते.
गोड पदार्थांसोबत चिया सीड्सचे सेवन करणे टाळावे. यामुळे चिया सीड्समधील पोषण तत्त्वे शरिराला मिळत नाहीत.
चिया सीड्स पाणी, दूधासोबत खाऊ शकता. याशिवाय ताजी फळ, स्मूदीमध्येही चिया सीड्स मिक्स करू शकता.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.