Makeup Tips तुमचं मेकअप प्रोडक्ट एक्सपायर झालंय का? ते फेकून देण्याऐवजी या सोप्या आणि स्मार्ट पद्धतींनी त्याचा पुन्हा वापर करू शकता. लिपस्टिक, मस्कारा, टोनर यांसारख्या वस्तू कशा वापरायच्या ते जाणून घ्या.
How to use expiry Makeup: मेकअपशिवाय तरुणींपासून ते विवाहित महिलांपर्यंत, सगळ्यांचंच फॅशन अपूर्ण वाटतं. आजकाल बाजारात टिंटेड क्रीमपासून ते आय मेकअप प्रायमरपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आता मेकअप आवडतो म्हटल्यावर मेकअप किटमध्ये भरपूर प्रोडक्ट्स असणारच. पण एकाच वेळी सगळ्या गोष्टी वापरल्या जात नाहीत, त्यामुळे अनेकदा मेकअप प्रोडक्ट्स एक्सपायर होतात. तुम्हीही अशा वस्तू फेकून देत असाल, तर थांबा. खराब झालेलं मेकअप चेहऱ्यावर लावलं जात नसलं तरी, त्याचा वापर क्लिनिंगपासून ते क्राफ्टिंगपर्यंत अनेक कामांसाठी होऊ शकतो.

खराब झालेलं ब्लश आणि कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही पेंट किंवा नेलपॉलिश बनवण्यासाठी वापरू शकता. यासाठी फक्त ऑलिव्ह ऑईल आणि पाण्याची गरज लागेल. मुलांना आर्ट शिकवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
लिपस्टिक आणि बाम साधारणपणे 1-3 वर्षांत खराब होतात. अनेकांना हे माहीत नसतं की, या वस्तूंमध्ये वॅक्सचा वापर केलेला असतो. याचा उपयोग लाकूड तुटण्यापासून वाचवण्यासाठी, स्क्रू घट्ट बसवण्यासाठी आणि अडकलेली झिप मोकळी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

किचनमध्ये कोणत्या डब्यात कोणता मसाला ठेवला आहे, हे जर तुम्ही विसरत असाल तर त्यावर आयलायनरच्या मदतीने नाव लिहा. याशिवाय, भिंती, लाकूड किंवा टाइल्सवर मार्किंग करण्यासाठी, तसेच शिलाईसाठी कपड्यांवर निशाण लावण्यासाठी एक्सपायर्ड आयलायनर वापरता येतो.
मस्कारा एक्सपायर झाल्यावर त्याचा ब्रश खूप कामाचा ठरतो. या ब्रशच्या मदतीने मोबाईल, लॅपटॉप आणि इअरबड्स स्वच्छ करता येतात. इतकंच नाही, तर कीबोर्डच्या बटणांमध्ये अडकलेली धूळ काढण्यासाठीही याचा वापर होतो.

टोनर, क्लिन्झर किंवा इतर कोणतंही लिक्विड प्रोडक्ट एक्सपायर झालं असेल, तर ते फेकू नका. या खराब झालेल्या टोनरने लेदर बॅग, चामड्याचे शूज किंवा लाकडी वस्तू साफ करा. पॉलिशशिवायही या वस्तू नव्यासारख्या चमकतील.
कंडिशनर किंवा फेस क्रीम खराब झाल्यावर डस्टबिनमध्ये टाकू नका. याचा वापर स्टीलचे गेट, भांडी, खिडक्या आणि लाकडी फर्निचरवरील डाग काढण्यासाठी करा.
कॉस्मेटिक्स एक्सपायर का होतात?
खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते कॉस्मेटिक प्रोडक्ट्सपर्यंत, प्रत्येक गोष्टीची एक मुदत असते. सततच्या वापरामुळे त्यात बॅक्टेरिया वाढतात, त्यामुळे ते वापरणं सुरक्षित मानलं जात नाही. मेकअप प्रोडक्ट्समध्ये मस्कारा ३-४ महिन्यांत खराब होऊ शकतो. फाउंडेशन ६-१२ महिन्यांत पाणी सोडू शकतं. पावडर १-२ वर्षं, तर लिपस्टिक १-२ वर्षं सुरक्षित मानली जाते. त्यामुळे वेळोवेळी एक्सपायरी डेट तपासत राहा.


