तुम्हाला हँडमेड आणि युनिक फॅशन ॲक्सेसरीज आवडत असतील, तर DIY क्रोशे पर्स तुमच्यासाठी एक भारी आयडिया आहे. कमी खर्चात लोकर आणि क्रोशे हुकच्या मदतीने तुम्ही घरीच स्टायलिश क्लच, टोट बॅग आणि डिझायनर पर्स सहज बनवू शकता.
Crochet Purse DIY Ideas: आजकाल क्रोशेचा ट्रेंड खूप वाढला आहे. विशेषतः तरुण मुली, लहान मुलं आणि महिलांमध्ये हँडमेड क्रोशेच्या वस्तू खूप पसंत केल्या जात आहेत. यातलीच एक वस्तू म्हणजे क्रोशे पर्स, जी दिसायला खूपच स्टायलिश आणि युनिक वाटते. चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही या पर्स घरी सहज बनवू शकता. तुमच्याकडे थोडा वेळ आणि क्रिएटीव्हीटी असेल, तर कमी खर्चात सुंदर क्रोशे पर्स तयार करता येईल. चला तर मग जाणून घेऊया घरी क्रोशे पर्स कशी बनवायची.

क्रोशे पर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य
क्रोशे पर्स बनवण्यासाठी तुम्हाला लोकर किंवा क्रोशेचा धागा, क्रोशे हुक, कात्री, सुई, बटण किंवा मॅग्नेट लॉक, चेन किंवा स्ट्रॅप आणि सजावटीसाठी मणी किंवा गोंड्यांची (tassels) गरज लागेल.
क्रोशे पर्स कशी बनवायची?
- क्रोशे पर्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या आवडीची लोकर (yarn) आणि क्रोशे हुक निवडा. आता पर्सचा बेस तयार करण्यासाठी चेन स्टिच (साखळी विणकाम) करा. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पर्सचा आकार लहान किंवा मोठा ठेवू शकता.
- त्यानंतर सिंगल क्रोशे किंवा डबल क्रोशे स्टिचच्या मदतीने गोल किंवा चौकोनी आकारात विणायला सुरुवात करा. जेव्हा पर्सचा पुढचा आणि मागचा भाग तयार होईल, तेव्हा दोन्ही भाग सुईच्या मदतीने एकत्र शिवून घ्या.
- आता पर्सच्या वरच्या बाजूला फ्लॅप (झाकण) तयार करा आणि त्याला बटण किंवा मॅग्नेट लॉक लावा. यानंतर, बाजूला चेन किंवा स्ट्रॅप जोडा, जेणेकरून पर्स सहज कॅरी करता येईल.

क्लच स्टाइल क्रोशे पर्स
अशा प्रकारच्या लहान क्लच स्टाइल क्रोशे पर्स आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. विशेषतः एथनिक कपड्यांवर तुम्ही ही पर्स कॅरी करू शकता. तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार वेगवेगळ्या रंगांमध्ये या पर्स बनवू शकता. इतकंच नाही, तर मल्टीकलर क्रोशे धाग्यानेही तुम्ही डिझाइन तयार करू शकता.

हँगिंग क्रोशे पर्स
जर तुम्हाला मोठी क्रोशे पर्स बनवायची असेल, तर गोल आकाराचे छोटे-छोटे क्रोशे पॅटर्न तयार करा आणि त्यांना एकत्र जोडून एक मोठी बॅग बनवा. या बॅगला स्ट्रॅप लावण्यासाठी तुम्ही मण्यांची माळ किंवा बेल्टचाही वापर करू शकता.

मुलांसाठी क्रोशे पर्स
तुम्ही मुलांसाठीसुद्धा सुंदर क्रोशे पर्स बनवू शकता. विशेषतः टीनएज मुलींना अशा प्रकारच्या पर्स खूप आवडतात. तुम्ही एक मोठी टोट बॅग बनवून त्यावर किटी, स्मायली किंवा एखाद्या गोंडस बाहुलीचं (doll) डिझाइन क्रोशेने तयार करू शकता.



