- Home
- Utility News
- Diwali Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ बदलला! दिवाळीला प्रॉफिटचं 'गोल्डन विंडो', आता पैसे तयार ठेवा!
Diwali Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ बदलला! दिवाळीला प्रॉफिटचं 'गोल्डन विंडो', आता पैसे तयार ठेवा!
Diwali Muhurat Trading 2025: दिवाळीत लक्ष्मीपूजनाला होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेत बदल झाला असून ते दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत होणार तज्ज्ञांच्या मते या दिवशी मोठ्या रकमेऐवजी कमी रकमेची गुंतवणूक फ्रंटलाइन स्टॉक्समध्ये करणे फायदेशीर ठरते.

दिवाळीत गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
मुंबई: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भारतीय गुंतवणूकदारांसाठी प्रतीकात्मक, पण महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त ट्रेडिंग यंदाही पार पडणार आहे. मात्र यंदा या ट्रेडिंगच्या वेळेत बदल करण्यात आला असून, गुंतवणूकदारांनी वेळ लक्षात ठेवून आधीच नियोजन करणे आवश्यक आहे.
BSE आणि NSE या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांत यावर्षी दिवाळीच्या दिवशी दुपारी 1.30 ते 3.00 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. पारंपरिक संध्याकाळी होणाऱ्या ट्रेडिंगच्या तुलनेत, हा वेळ यंदा बदलण्यात आला असून एक्सचेंजच्या विशेष विनंतीनुसार तो निश्चित करण्यात आला आहे.
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी बाजारात केलेली प्रतीकात्मक गुंतवणूक. या दिवशी ट्रेडिंग केल्यास वर्षभर भरभराट होते, अशी अनेक गुंतवणूकदारांची श्रद्धा आहे. म्हणूनच अनेकजण याच दिवशी नवीन शेअर्सची खरेदी करून आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. ही परंपरा 1957 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सुरू झाली. व्यापारी वर्ग आपली खाती पूजन करून, नव्या व्यवहाराची सुरुवात याच मुहूर्तावर करतो.
काय म्हणतात तज्ज्ञ?
गुंतवणूक सल्लागार विनय नेर्लेकर यांच्या मते, "मुहूर्त ट्रेडिंगचा हेतू नफा कमावणे नसून, आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे हा आहे. त्यामुळे मोठ्या रकमेची गुंतवणूक न करता, थोड्या रकमेने फ्रंटलाइन स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे योग्य." ते पुढे सांगतात की, मुहूर्त ट्रेडिंगमध्ये वेळ कमी असल्याने बाजार अधिक अस्थिर असू शकतो. त्यामुळे इंट्रा-डे ट्रेडिंग, F&O व्यवहार यापासून दूर राहणेच योग्य.
ट्रेडिंगचा वेळ आणि स्ट्रक्चर
मुहूर्त ट्रेडिंगचा एकूण कालावधी 1.5 तास असतो. यात
15 मिनिटांचे प्री-ओपन सेशन
मुख्य ट्रेडिंग सत्र
15 मिनिटांचे पोस्ट-क्लोजिंग सेशन
या काळात बाजारात अचानक चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे शांत डोक्याने आणि योजनेनुसार गुंतवणूक करावी.
गुंतवणुकीसाठी योग्य स्टॉक्स कोणते?
तज्ज्ञांच्या मते, या दिवशी टॉप ५ स्थिर कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे योग्य ठरते.
हे शेअर्स दीर्घकालीन नफ्याच्या दृष्टीने सुरक्षित मानले जातात.
मुहूर्त ट्रेडिंग: परंपरा आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे फक्त व्यवहार नाही, तर भारतीय परंपरा आणि आधुनिक अर्थकारणाचा सुंदर संगम आहे. दिवाळीच्या शुभ दिवशी केलेली छोटीशी गुंतवणूकही उत्साह, नव्या आशा आणि सकारात्मकतेचा आरंभ बनते.

