Diwali 2025 : हे पदार्थ कोलेस्ट्रॉलचा करतात नायनाट, आहारात नक्कीच सामील करा!
Diwali 2025 : शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करणारे पदार्थ
चला काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आपोआप शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. तुमचे आरोग्य ठणठणित राहते. दिवाळीच्या दिवसांमध्ये तर हे पदार्थ तर अत्यंत महत्त्वाचे आहेत.
फॅटी फिश (मासे)
ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले फॅटी फिश खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे तुमचे शरीर आतून स्वच्छ होते.
ओट्स
ओट्स नियमितपणे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ओट्सचे अनेक पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता.
नट्स (सुकामेवा)
फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेले नट्स नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो. पण त्याला इतर कोणताही फ्लेअवर देऊ नका. किंवा चॉकलेट सारखे कोटिंग देऊ नका.
भेंडी
फायबरयुक्त भेंडी खाल्ल्यानेही कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. भेंडीच्या भाजीचा समावेश आहारात करायला हवा. आठवड्यातून एकदा तरी भेंडी खायला हवी.
सफरचंद
फायबरयुक्त सफरचंद नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे कमी जावे लागते असेही म्हटले जाते.
डाळी आणि कडधान्ये
फायबर आणि प्रथिने असलेल्या डाळी व कडधान्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. डाळींचा आहारात समावेश असावा. तो कोणत्या स्वरुपात ते तुम्ही ठरवू शकता.
ऑलिव्ह ऑईल
आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हे ऑईल तुम्ही साजूक स्वरुपात किंवा कच्च्या तेलाच्या स्वरुपात वापरु शकता.

