Diseases in 2025 : सरत्या वर्षांत संसर्गजन्य काही आजारांची सर्वाधिक नोंद झाली. त्यात गोवर (Measles) हा रुबिओला विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. खूप ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळे लाल होणे आणि शरीरावर लाल पुरळ येणे ही याची मुख्य लक्षणे आहेत.
Diseases in 2025 : धावपळीचे आयुष्य, बदललेली जीवनशैली तसेच जंक फूड आणि प्रिझर्व्हेटिव्ह फूडकडे वाढता कल… त्यात भरीस भर म्हणून वाढते प्रदूषण याचा परिणाम मानवाच्या प्रकृतीवर थेट होऊ लागला आहे. मधूमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार असलेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर दुसरीकडे, संसर्गजन्य आजारांचा प्रसारही होत आहे. मूळात सकस आहाराच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती क्षीण होते, हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. 2025 मध्ये आपण विविध आजारांमधून गेलो. सरत्या वर्षात सर्वाधिक नोंद झालेल्या पाच आजारांबद्दल आता आपण जाणून घेऊया...
डेंग्यू आणि डासांमुळे पसरणारे इतर आजार
2025 मध्ये डेंग्यूची सर्वाधिक प्रकरणे होती. विशेषतः शहरी भागात. पावसाळ्यात घरांजवळ डासांची पैदास वाढली. परिणामी, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांचा वेगाने प्रसार झाला.
मलेरिया, चिकुनगुनिया, झिका, पीतज्वर, जॅपनीज एन्सेफलायटीस, वेस्ट नाईल व्हायरस हे संक्रमित डासांमुळे पसरणारे गंभीर आजार आहेत. ताप/ त्वचेवर पुरळ (डेंग्यू, झिका, चिकुनगुनिया) यापासून तीव्र सांधेदुखी (चिकुनगुनिया), कावीळ (पीतज्वर) आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या (जॅपनीज एन्सेफलायटीस, वेस्ट नाईल) अशी विविध लक्षणे यामध्ये दिसून येतात.
सीझनल इन्फ्लूएंझा
सीझनल इन्फ्लूएंझा (फ्लू) हे इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे होणारा एक तीव्र श्वसन संक्रमण आहे. जगाच्या सर्व भागांमध्ये तो कॉमन आहे. बहुतेक लोक उपचारांशिवाय बरे होतात. खोकल्याने किंवा शिंकण्याने इन्फ्लूएंझा लोकांमध्ये सहज पसरतो. लसीकरण हा आजार रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी आणि थकवा ही इन्फ्लूएंझाची लक्षणे आहेत.
गोवर
मावळत्या वर्षात अनेक भागांमध्ये गोवरची नोंद झाली. लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये अनेक प्रकरणे आढळून आली. गोवर (Measles) हा रुबिओला विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. तीव्र ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळे लाल होणे आणि शरीरावर लाल पुरळ येणे ही याची मुख्य लक्षणे आहेत. लसीकरण (MR लस) हा आजार रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. तो हवेतून आणि संक्रमित व्यक्तींच्या स्रावातून पसरू शकतो.
डोळे आणि त्वचेचे संक्रमण
डोळे येणे (Conjunctivitis) आणि त्वचेचे बुरशीजन्य संक्रमण यात सातत्याने वाढ झाली. गर्दीची ठिकाणे, एकमेकांचे टॉवेल वापरणे, जिममधील उपकरणे आणि दमट हवामान यांचा या आजाराशी संबंध आहे. तथापि, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता फारच कमी असते.


