- Home
- Utility News
- Bank Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३५० पदांची महाभरती! १ लाखांहून अधिक पगाराची संधी; आजच करा अर्ज
Bank Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३५० पदांची महाभरती! १ लाखांहून अधिक पगाराची संधी; आजच करा अर्ज
Bank Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मार्केटिंग आणि फॉरेन एक्सचेंज विभागात एकूण ३५० ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या सरकारी नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार मिळणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३५० पदांची महाभरती!
Bank Recruitment : सरकारी बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) सुवर्णसंधी घेऊन आली आहे. मार्केटिंग आणि फॉरेन एक्सचेंज विभागात 'ऑफिसर' पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार आणि सरकारी नोकरीचे लाभ मिळणार आहेत.
रिक्त पदांचा तपशील
या भरती मोहिमेद्वारे एकूण ३५० जागा भरल्या जाणार आहेत.
मार्केटिंग ऑफिसर: ३०० जागा
फॉरेन एक्सचेंज ऑफिसर: ५० जागा
पगार आणि वयोमर्यादा
पगार: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४८,४८० रुपये ते १,०५,३८० रुपये इतके भरघोस वेतन मिळेल.
वयोमर्यादा: २२ ते ३५ वर्षे (पदानुसार वयोमर्यादेत बदल असू शकतो).
पात्रता आणि शैक्षणिक अटी
१. फॉरेन एक्सचेंज ऑफिसर: मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी (Graduation) आवश्यक. ज्यांनी CFA, CA किंवा MBA पूर्ण केले आहे, त्यांना प्राधान्य मिळेल.
२. मार्केटिंग ऑफिसर: MBA (मार्केटिंग), बिझनेस अॅनालिटिक्समधील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष डिप्लोमा आवश्यक.
निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
सेंट्रल बँकेतील या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
अर्ज सुरू होण्याची तारीख: २० जानेवारी २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ फेब्रुवारी २०२६
लेखी परीक्षा (अंदाजे): फेब्रुवारी किंवा मार्च २०२६
मुलाखत (अंदाजे): मार्च किंवा एप्रिल २०२६
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा
बँकेच्या अधिकृत वेबसाईट centralbank.bank.in ला भेट द्या.
'Recruitment' सेक्शनमध्ये जाऊन 'Apply Online' वर क्लिक करा.
तुम्ही थेट IBPS च्या पोर्टलवर पोहोचाल, तिथे तुमची नोंदणी करून अर्ज पूर्ण करा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जाचे शुल्क भरा.
लक्षात ठेवा
अर्ज करण्यासाठी केवळ १० दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपला फॉर्म भरून घ्या!

