RCFL MT Recruitment 2024: ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’मध्ये भरती सुरू, कसा करा अर्ज

| Published : Jun 10 2024, 11:44 AM IST

RCFL MT Recruitment 2024
RCFL MT Recruitment 2024: ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’मध्ये भरती सुरू, कसा करा अर्ज
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

RCFL MT Recruitment 2024: इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १ जुलै २०२४ पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

RCFL MT Recruitment 2024: केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत मुंबई येथे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ यांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया काल ८ जून २०२४ पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १ जुलै २०२४ पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रिक्त पदे आणि पदसंख्या

१५८ मॅनेजमेंट ट्रेनी आणि अधिकारी पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

१. मॅनेजमेंट ट्रेनी (रासायनिक) – ५१

२. मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल ) – ३०

३. मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – २७

४. मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) – १८

५. मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) – ४

६. मॅनेजमेंट ट्रेनी (फायर) – २

७. मॅनेजमेंट ट्रेनी (सीसी लॅब) – १

८. मॅनेजमेंट ट्रेनी (औद्योगिक अभियांत्रिकी) – ३

९. मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग ) – १०

१०. मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्सेस) – ५

११. मॅनेजमेंट ट्रेनी (Administration ) – ४

१२. मॅनेजमेंट ट्रेनी (कॉर्पोरेट कॅम्युनिकेशन) – ३

अर्ज फी

ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी असणार आहे. ही अर्ज फी जीएसटीसह (GST) असणार आहे. तसेच एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबी डी/ एक्सएसएम महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवार इंटरनेट बँकिंग खाते किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा पर्याय निवडू शकतात.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २७ वर्षे असावे.

अर्ज कसा कराल?

१. सर्वप्रथम http://www.rcfltd.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२. होम पेजवरील RCFL recruitment 2024 या लिंकवर क्लिक करा.

३. आवश्यक माहिती प्रदान करा.

४. फॉर्म सबमिट करा.

५. आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.

६. कृपया भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउटसुद्धा काढून ठेवा.

लिंक

https://www.rcfltd.com/

पदानुसार शैक्षणिक पात्रता व पगार उमेदवारांनी अधिसूचनेत तपासून घ्यावा.

लिंक

https://www.rcfltd.com/files/DETAILED%20ADVT%20FOR%20MT%202024.pdf

उमेदवारांनी काळजीपूर्वक अधिसूचना वाचून मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.