बारावी पास असणाऱ्यांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमध्ये मोठी भरती

| Published : Jun 06 2024, 01:41 PM IST

ICMR NIN Jobs 2024

सार

ICMR NIN Jobs 2024 : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. भरती संदर्भातील सगळी माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.

 

ICMR NIN Jobs 2024 : आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते. थेट आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. वयाची आणि शिक्षणाची अट ही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आली.

या भरती प्रक्रियेतून सहाय्यक गट ब, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर अशी विविध पदे भरली जातील. 23 मे पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जून 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. nin.res.in या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावी लागतील. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आली.

साधारणपणे बारावी पास ते पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. जुलै महिन्यात परीक्षा होणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे. साधारण 35 हजार ते 1 लाखांपर्यंत पगार मिळेल.