सार
ज्या उमेदवारांना आयबीपीएसच्या RRB लिपिक आणि अधिकारी पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (The Institute of Banking Personnel Selection) म्हणजेच आयबीपीएस (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेचा उद्देश गट A अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट B कार्यालयीन सहाय्यकची नियुक्ती करणे हा आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि लिपिक यांसारख्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती मोहीम एक उत्तम संधी आहे. ही अधिसूचना ७ जूनला प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना IBPS RRB लिपिक आणि अधिकारी पदांसाठी अर्ज करायचा आहे ते आयबीपीएसच्या (IBPS) अधिकृत वेबसाइट ibps.in वर अर्ज करू शकतात.
रिक्त पदे आणि पदसंख्या
या भरती मोहिमेद्वारे गट A अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट B कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) च्या ९९२३ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे.
वयोमर्यादा
अधिकारी स्केल १ (सहाय्यक व्यवस्थापक) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षे यादरम्यान असावे.
ऑफिस असिस्टंट (लिपिक) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षे असावे.
अधिकारी स्केल-२ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३२ वर्षे असावे.
अधिकारी स्केल-३ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४०वर्षे असावे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या सर्व पदांसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा यांचा समावेश आहे. पण अधिकारी (स्केल-I, II आणि III) च्या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत सुद्धा घेतली जाईल.
अर्ज फी
अर्ज फी सर्वांसाठी ८५० रुपये आहे. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांनी अधिकारी (स्केल I, II आणि III) साठी अर्ज करताना १७५ रुपये फी असणार आहे. अर्जशुल्क जीएसटीसह असणार आहे.
महत्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ७ जून २०२४ पासूनच सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२४ असणार आहे.
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) साठी कॉल लेटर डाउनलोड करण्याची तारीख १ जुलै २०२४ असणार आहे.
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (पीईटी) आयोजित करण्यात येणार आहे त्याची तारीख २२ जुलै २०२४ ते २७ जुलै २०२४ असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
विविध पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचनेतून शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी.
लिंक
https://ibps.in/wp-content/uploads/CRP_RRBs_XIII_notification_6.6.24.pdf
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
आणखी वाचा :
CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत होणार मोठी भरती!, पाहा अर्जाची अंतिम तारीख