Car Market: एका चार्जमध्ये 680km पर्यंत धावणाऱ्या भारतातील टॉप 4 ईव्ही कार्स!
Car Market: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. पण सध्या एका चार्जमध्ये गाडी किती धावते हे महत्त्वाचं ठरतंय. याच पार्श्वभूमीवर, 500 ते 680 किमी रेंज देणाऱ्या भारतातील टॉप 4 इलेक्ट्रिक SUV मॉडेल्सची माहिती घेऊया.
15

Image Credit : Asianet News
4 दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स
सोन्यासारखेच पेट्रोल-डिझेलचे भाव रोज नवीन उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळले आहेत. पूर्वी लोक ईव्ही कार घेताना फक्त डिझाइन आणि बजेट पाहायचे, पण आता एका चार्जमध्ये गाडी किती किलोमीटर धावते, याला जास्त महत्त्व दिलं जातंय. ग्राहकांची हीच गरज ओळखून, 500 किमी ते 680 किमी पर्यंतची जबरदस्त रेंज देणाऱ्या 4 इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric SUV) सध्या भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : mahindra
महिंद्रा BE 6 (Mahindra BE6)
सध्या भारतीय बाजारात सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून महिंद्राच्या BE 6 मॉडेलची ओळख आहे. ही कार 59kWh आणि 79kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही गाडी तब्बल 682 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. यात 286 हॉर्सपॉवरची ताकद आहे. रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) सिस्टीम असलेली ही कार लांबच्या प्रवासासाठी एक उत्तम पर्याय मानली जाते.
35
Image Credit : Instagram
महिंद्रा XEV 9e (Mahindra XEV 9e)
जे लोक सतत लांबचा प्रवास करतात आणि ज्यांना आरामदायी प्रवासाची आवड आहे, त्यांच्यासाठी महिंद्राने ही प्रीमियम एसयूव्ही आणली आहे. ही कारसुद्धा 59kWh आणि 79kWh बॅटरी पॅकसह येते आणि 286 hp पॉवर जनरेट करते. यातील मोठ्या बॅटरीचं मॉडेल एका चार्जमध्ये 656 किलोमीटरपर्यंत धावते. प्रीमियम लूक आणि आरामदायी सुविधांसोबतच जास्त मायलेज देणारं मॉडेल म्हणून ही गाडी बाजारात उतरली आहे.
45
Image Credit : Google
टाटा हॅरियर ईव्ही (Tata Harrier EV)
टाटा मोटर्सच्या दमदार 'हॅरियर' गाडीचा हा इलेक्ट्रिक अवतार आहे. ज्यांना परफॉर्मन्समध्ये कोणतीही तडजोड नको असते, त्यांच्यासाठी ही एक उत्तम कार आहे. यात 75kWh क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही एसयूव्ही 627 किमीपर्यंतची रेंज देते. रियर-व्हील आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) पर्यायांमध्ये येणारी ही कार फक्त 6.3 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग गाठते. लांब पल्ल्याच्या प्रवासाची क्षमता हवी असणाऱ्यांसाठी ही एसयूव्ही अत्यंत योग्य आहे.
55
Image Credit : our own
मारुती ई-वितारा (Maruti e-Vitara)
मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही 'ई-वितारा' खास मध्यमवर्गीय कुटुंबं आणि रोज ऑफिसला जाणाऱ्यांसाठी डिझाइन केली आहे. यात 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पर्याय आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध BYD कंपनीची सुरक्षित 'LFP ब्लेड बॅटरी' टेक्नॉलॉजी वापरली आहे. यातील 61kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक एका चार्जमध्ये सुमारे 543 किलोमीटरची रेंज देतो. लाँग बॅटरी लाईफ आणि मारुतीची विश्वासार्ह सुरक्षा ही या गाडीची अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.

