Car Market: ह्युंदाईची हायब्रीड SUV ची फौज, 3 नव्या गाड्या येणार बाजारात!
Car Market: ह्युंदाई पुढच्या 5 वर्षांत तब्बल 26 नव्या गाड्या आणणार आहे. यात भारतासाठी खास 3 हायब्रीड SUV असतील. यामध्ये नेक्स्ट-जनरेशन क्रेटा, नवी ७-सीटर Ni1i आणि फ्लॅगशिप मॉडेल Palisade यांचा समावेश आहे.

एकूण 26 नवीन मॉडेल्स
दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाई एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. पुढच्या पाच वर्षांत आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी कंपनी एकूण 26 नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे.
हायब्रीड एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाई
तीन नव्या हायब्रीड एसयूव्ही
ह्युंदाई भारतात तीन नव्या हायब्रीड SUV लाँच करणार आहे. याची सुरुवात 2027 मध्ये नेक्स्ट-जनरेशन ह्युंदाई क्रेटाने होईल, जी कंपनीची पहिली हायब्रीड कार असेल. यानंतर, कंपनी आणखी दोन ७-सीटर हायब्रीड SUV - ह्युंदाई Ni1i आणि ह्युंदाई Palisade लाँच करेल.
नवी 7-सीटर एसयूव्ही
इंजिन आणि फीचर्स
कंपनीने अजून अधिकृत माहिती दिली नसली तरी, ही SUV चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या ह्युंदाई Tucson LWB वर आधारित असेल असं मानलं जातं. यात हायब्रीड टेक्नॉलॉजीसह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हेच इंजिन नव्या क्रेटा हायब्रीडमध्येही दिलं जाईल.
प्रीमियम फ्लॅगशिप एसयूव्ही
ह्युंदाईची फ्लॅगशिप SUV, Palisade, आधीच ग्लोबल मार्केटमध्ये 7 आणि 8-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. भारतात ही SUV प्रीमियम सेगमेंटमध्ये लाँच होईल. नव्या Palisade मध्ये कंपनीचं नवीन 2.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल, जे सुमारे 334 bhp पॉवर आणि ४६० Nm टॉर्क निर्माण करतं. गाडीचं मायलेज 14.1 किमी/लिटर असल्याचं म्हटलं जातं आणि तिची एकूण ड्रायव्हिंग रेंज 1015 किमीपर्यंत असू शकते.

