- Home
- Utility News
- Bank Recruitment 2026 : परीक्षा नाही, थेट नोकरीची संधी! सरकारी बँकेशी संलग्न संस्थेत विविध पदांसाठी भरती जाहीर
Bank Recruitment 2026 : परीक्षा नाही, थेट नोकरीची संधी! सरकारी बँकेशी संलग्न संस्थेत विविध पदांसाठी भरती जाहीर
Bank Recruitment 2026 : इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिस लिमिटेडमध्ये रिलेशनशिप मॅनेजर, डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट अशा विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही परीक्षा नसून, पात्र उमेदवारांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे.

परीक्षा नाही, थेट नोकरीची संधी!
Bank Recruitment 2026 : सरकारी बँकेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. इंडियन बँकेची सहायक कंपनी – इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिस लिमिटेड येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही स्पर्धा परीक्षा नाही, त्यामुळे पात्र उमेदवारांना थेट जॉब ऑफर मिळण्याची संधी आहे. या भरतीमुळे तरुणांना चांगल्या पगारासह स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
इंडबँकमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
रिलेशनशिप मॅनेजर
डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट
सेक्रेटरिएट ऑफिसर – ट्रेनी (बॅक ऑफिस)
स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्ससाठी डीलर
निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 4 ते 5 लाख रुपये पॅकेज दिले जाणार असून इन-हँड सॅलरीही आकर्षक असेल.
पात्रता आणि अनुभव
रिलेशनशिप मॅनेजर: MBA (मार्केटिंग किंवा फायनान्स) आणि किमान 2 वर्षांचा अनुभव
डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट: कॉम्प्युटर सायन्स किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये पदवी व 4–5 वर्षांचा अनुभव
सेक्रेटरिएट ऑफिसर – ट्रेनी: कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र
या भरतीसाठी 21 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
उमेदवारांनी इंडबँकच्या अधिकृत वेबसाइट www.indbankonline.com येथून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करावा.
अर्ज योग्य प्रकारे भरून आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावा.
Head Administration,
First Floor, Khivraj Complex-I,
Anna Salai, Nandanam,
Chennai – 600035
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी 25 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. कोणतीही लेखी परीक्षा नसल्यामुळे उमेदवारांसाठी ही भरती मोठा दिलासा देणारी ठरत आहे. बँकिंग क्षेत्रात थेट प्रवेश मिळवण्याची ही संधी गमावू नका!

