Onion Cultivation : आपल्या स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या गोष्टींमध्ये कांद्याचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. विषमुक्त कांदा स्वतःच्या घरी, परसबागेत उगवणं खूप सोपं आहे. तुमच्याकडे थोडी जागा किंवा काही कुंड्या असल्या तरी तुम्ही सहज कांद्याची लागवड करू शकता.

Onion Cultivation : आपल्या स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या गोष्टींमध्ये कांद्याचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. विषमुक्त कांदा स्वतःच्या घरी, परसबागेत उगवणं खूप सोपं आहे. तुमच्याकडे थोडी जागा किंवा काही कुंड्या असल्या तरी तुम्ही सहज कांद्याची लागवड करू शकता.

लागवडीसाठी योग्य वेळ

केरळमध्ये कांदा लावण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ सर्वात चांगला मानला जातो, म्हणजे त्यांच्याकडचा परतीचा पाऊस संपल्यावर. या काळात रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. कांद्याच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते. मातीत थोडी वाळू मिसळल्यास पाणी साचून राहत नाही. जमीन चांगली खोदून, ढेकळं फोडून घ्या. त्यात शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून लागवडीसाठी छोटे वाफे तयार करा. जर तुम्ही कुंडीत कांदा लावणार असाल, तर सहा ते आठ इंच खोल कुंडी निवडा.

लागवड कशी करावी?

साधारणपणे छोटे कांदे वापरून लागवड केली जाते. ही सर्वात सोपी पद्धत आहे. बाजारातून आणलेले चांगल्या आकाराचे छोटे कांदे घ्या. त्यांचा वरचा भाग थोडा कापून टाका आणि नंतर ते मातीत लावा. लावताना कांद्याचा थोडा भाग जमिनीच्या वर दिसेल याची काळजी घ्या. बियांपासूनही लागवड करता येते, पण त्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते.

लागवड करताना जमिनीत ओलावा असावा, पण जास्त पाणी दिल्यास मुळं सडू शकतात. त्यामुळे जमीन कोरडी झाल्यावरच पाणी द्या. कांदा मोठा होऊ लागल्यावर पाणी देणं कमी केलेलं चांगलं. रोपाच्या वाढीवर परिणाम होणार नाही अशाप्रकारे वेळोवेळी तण काढत राहा. लागवड केल्यापासून तीस दिवसांनी थोडी आंबवलेली शेंगदाणा पेंड किंवा इतर सेंद्रिय खतं दिल्यास कांद्याचा आकार वाढायला मदत होते.

काढणी

लागवड केल्यापासून साठ ते पंच्याहत्तर दिवसांत कांदा काढणीसाठी तयार होतो. कांद्याची पानं पिवळी पडून सुकतात आणि जमिनीवर पडायला लागतात. हे कांदा काढणीला आल्याचं लक्षण आहे. काढणी केलेला कांदा थेट उन्हात वाळवू नका. त्याऐवजी, पाल्यासोबतच दोन-तीन दिवस सावलीत वाळवा. त्यानंतर पानं कापून टाका आणि कांदा दमटपणा नसलेल्या ठिकाणी साठवून ठेवा.