- Home
- Utility News
- हुर्रे...! आता कॉलेजचे दिवस होतील आणखी मजेदार, Bajaj Pulsar वर हॅट्रिक ऑफर, 15000 पेक्षा अधिक बचत
हुर्रे...! आता कॉलेजचे दिवस होतील आणखी मजेदार, Bajaj Pulsar वर हॅट्रिक ऑफर, 15000 पेक्षा अधिक बचत
Bajaj Pulsar Hattrick Offer : बजाज ऑटोने आपली लोकप्रिय पल्सर हॅट्रिक ऑफर पुन्हा देशभरात वाढवली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना GST कपात, शून्य प्रोसेसिंग फी आणि विम्यावर सवलत असे अनेक फायदे मिळत आहेत.

बजाज पल्सर हॅट्रिक ऑफर
वर्षअखेरीस, दुचाकी उत्पादक बजाज ऑटोने आपली लोकप्रिय पल्सर हॅट्रिक ऑफर पुन्हा जाहीर केली आहे. दिवाळीनंतरही ग्राहकांची मागणी कमी न झाल्याने ही ऑफर देशभरात पुन्हा वाढवण्यात आली आहे. विशेषतः कमी गुंतवणुकीत बाईक खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
हॅट्रिक पॅकेज
या ऑफरमध्ये बजाज तीन प्रकारचे फायदे एकत्र देत आहे, म्हणूनच याला हॅट्रिक पॅकेज म्हटले जाते. सरकारने कमी केलेल्या GST चा पूर्ण लाभ कंपनी थेट ग्राहकांना देत आहे. यामुळे बाईकची किंमत आपोआप कमी होते. बजाजने बाईक खरेदी करताना आकारली जाणारी प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ केली आहे. विम्याच्या खर्चातही सवलत दिल्याने सुरुवातीचा खर्च आणखी कमी होतो.
बजाज पल्सरवर सवलत
दिल्लीतील आकडेवारीनुसार, प्रत्येक बजाज मॉडेलवर मिळणारी सवलत वेगवेगळी आहे. पल्सर 125 CF खरेदी करणाऱ्यांना 10,911 पर्यंत बचत करण्याची संधी आहे. यात 8,011 GST कपात आणि 2,900 प्रोसेसिंग फी व विमा सवलत यांचा समावेश आहे. तसेच, पल्सर NS125 ABS मॉडेलवर 12,206 पर्यंत बचत मिळत आहे.
बाईकच्या किमतीत घट
यात 9,006 GST सवलत आणि 3,200 इतर सवलतींचा समावेश आहे. सर्वात जास्त फायदा पल्सर N160 USD मॉडेलवर मिळत आहे. यावर एकूण 15,759 ची बचत होत आहे, ज्यात 11,559 GST कपात आणि 4,200 ची अतिरिक्त सवलत आहे. कुटुंबांसाठी लोकप्रिय असलेली प्लॅटिना 110 मॉडेलवरही 8,641 पर्यंत सवलत मिळत आहे.
