- Home
- Utility News
- महिन्याचा खर्च फक्त 357 रुपये, पेट्रोलच्या किमतीत भरा EMI, Ather Rizta S म्हणजे बचतच बचत!
महिन्याचा खर्च फक्त 357 रुपये, पेट्रोलच्या किमतीत भरा EMI, Ather Rizta S म्हणजे बचतच बचत!
Ather Rizta S Electric Scooter Save Big on Fuel Costs : एथर एनर्जीची Rizta S महिन्याला फक्त २,५३१ रुपयांच्या EMI वर उपलब्ध आहे. ही स्कूटर १२३ किमीची रेंज, आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत वर्षाला ३३,२१६ रुपयांपर्यंतची बचत देते.

एथर रिझ्टा स्कूटर
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एथर एनर्जीचे Rizta S मॉडेल कमी EMI वर उपलब्ध आहे. कमी खर्च आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ही स्कूटर लोकप्रिय होत आहे.
रिझ्टा एस स्कूटर
एथर Rizta S ची एक्स-शोरूम किंमत १,१४,८४२ रु. आहे. सबसिडीनंतर ही स्कूटर फक्त २,५३१ रु. च्या EMI वर खरेदी करता येते. यावर २०,००० रुपयांपर्यंतचे अतिरिक्त फायदेही आहेत.
८ वर्षांची वॉरंटी
Rizta S एका चार्जमध्ये १२३ किमी धावते. यात ३.७ kWh बॅटरी असून त्यावर ८ वर्षांची वॉरंटी आहे. यात ३४-लिटर स्टोरेज, ७-इंचाचा डिस्प्ले आणि अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.
३३,००० रुपयांपर्यंत बचत
रोज ५० किमी प्रवासासाठी पेट्रोल स्कूटरला महिन्याला ३,१२५ रु. लागतात. Rizta S चा खर्च फक्त ३५७ रु. येतो. यामुळे वर्षाला ३३,२१६ रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर
Rizta S अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड रंगांव्यतिरिक्त, काही खास रंगांसाठी २,००० रु. अतिरिक्त लागतील. देशभरात आर्थरचे ३,९०० पेक्षा जास्त फास्ट चार्जिंग स्टेशन्स आहेत.

