मुलांची बेडरूम फक्त दिसायला सुंदर असून चालत नाही, तर ती त्यांच्या गरजा पूर्ण करणारीही असावी. थोड्या क्रिएटिव्ह आयडिया वापरून तुम्ही तुमच्या मुलांच्या खोलीला एक आनंदी आणि प्रेरणादायी जागा बनवू शकता.

मुलांची खोली म्हणजे फक्त झोपायची जागा नसते, तर ते त्यांचं एक छोटंसं जग असतं. इथेच ती खेळतात, शिकतात आणि आपली स्वप्नं रंगवतात. त्यामुळे मुलांच्या खोलीचं डिझाइन करताना फक्त सजावटीचा नाही, तर सुरक्षितता, आराम आणि क्रिएटिव्ह वातावरणाचा समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अशी खोली बनवायची असेल जी दिसायला क्युट असेल आणि तितकीच उपयोगीही, तर या ७ डिझाइन आयडिया तुमच्या नक्की कामी येतील.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुलांच्या आवडीची थीम-बेस्ड बेडरूम

थीम-बेस्ड बेडरूम मुलांना सगळ्यात जास्त आवडतात. कारण या खोल्या त्यांच्या आवडत्या कार्टून, प्रिन्सेस, जंगल किंवा स्पेसच्या थीमवर तयार केलेल्या असतात. जेव्हा भिंतींवर त्याच थीमचे स्टिकर्स किंवा पेंटिंग्ज असतात आणि बेडशीट, कुशन्स व बाकीचं डेकोरेशनही त्याला मॅचिंग असतं, तेव्हा संपूर्ण खोली एखाद्या गोष्टीसारखी वाटते. यामुळे मुलं त्यांच्या खोलीशी भावनिकरित्या जोडली जातात आणि तिथे जास्त वेळ घालवणं पसंत करतात.

सॉफ्ट आणि सुरक्षित फर्निचर

मुलांच्या खोलीतलं फर्निचर दिसायला सुंदर असण्यासोबतच पूर्णपणे सुरक्षितही असायला हवं. कमी उंचीचा बेड, गोलाकार कडा असलेलं टेबल आणि मऊ खुर्च्या मुलांसाठी perfecct असतात. जमिनीवर मऊ मॅट किंवा कार्पेट टाकल्यामुळे मुलं आरामात खेळू शकतात आणि पडल्यावर त्यांना दुखापत होण्याचा धोकाही कमी होतो. असं डिझाइन पालकांनाही टेंशन-फ्री ठेवतं.

रंगीत भिंती आणि मंद प्रकाशयोजना

मुलांच्या खोलीत पेस्टल ब्लू, पिंक, पिवळा आणि हिरव्यासारखे हलके आणि ब्राईट रंग वापरल्यास संपूर्ण वातावरण सकारात्मक आणि उत्साही वाटतं. यासोबतच, सॉफ्ट लाईटिंग आणि छोटे नाईट लॅम्प खोलीला अधिक आरामदायक बनवतात. रात्रीच्या वेळी मंद प्रकाशामुळे मुलांना सुरक्षित वाटतं आणि त्यांची भीतीही कमी होते.

अभ्यास आणि खेळासाठी खास कोपरा

चांगली কিডস बेडरूम तीच असते, जिथे अभ्यास आणि खेळ या दोन्हींसाठी वेगवेगळी जागा असते. एक छोटं स्टडी टेबल, खुर्ची आणि बुक शेल्फसोबत एक प्ले-एरिया बनवल्यास मुलं सहजपणे आपला वेळ मॅनेज करायला शिकतात. हे डिझाइन त्यांच्यातील क्रिएटीव्हीटी आणि शिस्त या दोन्हींना प्रोत्साहन देतं.

आणखी वाचा - फ्लॉवर पॉट: लहान आकाराच्या फुलदाण्या, १०० रुपयांत मिळवा ६ अँटिक डिझाइन्स

स्मार्ट स्टोरेजने खोली ठेवा व्यवस्थित

मुलांच्या खोलीत खेळणी आणि पुस्तकांचा पसारा असणं ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे स्मार्ट स्टोरेज खूप गरजेचं ठरतं. स्टोरेज बॉक्स, भिंतीवरचे शेल्फ आणि मल्टी-यूज फर्निचरच्या मदतीने खोली नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवता येते. यामुळे मुलांनाही हळूहळू त्यांच्या वस्तू जागेवर ठेवायची सवय लागते.

वॉल डेकोर आणि पर्सनल टच

जेव्हा खोलीत मुलांचे फोटो, त्यांनी काढलेली चित्रं किंवा त्यांच्या नावाची पाटी लावली जाते, तेव्हा ती जागा आणखी खास बनते. DIY डेकोर आणि छोट्या-छोट्या क्राफ्ट आयटम्समुळे खोलीला एक युनिक आणि पर्सनल फील येतो. यामुळे मुलं आपल्या खोलीला स्वतःची ओळख मानतात आणि तिथे त्यांना जास्त आनंद मिळतो.

आरामदायक बेड आणि शांत झोप

मुलांच्या वाढीसाठी त्यांची चांगली झोप खूप आवश्यक असते, त्यामुळे बेड आरामदायक असायलाच हवा. मऊ गादी, हलकी आणि हवा खेळती राहील अशी बेडशीट आणि एक छोटा नाईट लॅम्प मिळून झोपेसाठी एक उत्तम वातावरण तयार करतात. यामुळे मुलं आरामात झोपतात आणि सकाळी फ्रेश उठतात.