DIY Planters घरात झाडं लावायची आहेत पण जागा कमी आहे? घरातल्या घरात लाकडी फळ्यांपासून सुंदर प्लांटर्स कसे बनवायचे? तुमच्या घराला लक्झरी लूक देणारे DIY वुडन प्लांटर्स कोणते आहेत? या लेखात सविस्तर जाणून घ्या.
Wooden Planter Ideas: घरात झाडं लावण्याची इच्छा तर खूप असते, पण जागा कमी असल्यामुळे अनेकदा मन मारावं लागतं. तुमचीही हीच अडचण असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी वॉल माउंटेड वुडन ब्लॉक प्लांटरच्या काही भन्नाट आयडिया घेऊन आलो आहोत. हे प्लांटर्स केवळ जागा वाचवत नाहीत, तर घराला एक आकर्षक आणि मॉडर्न लूकसुद्धा देतात. चला तर मग, अशा ६ डिझाइन्स पाहूया, ज्या तुम्ही जास्त कष्ट न घेता घरच्या घरी DIY पद्धतीने तयार करू शकता.


मल्टी-टियर वुडन शेल्फ प्लांटर
जर तुम्हाला जास्त पसारा आवडत नसेल, तर तुम्ही लाकडी फळ्यांच्या मदतीने हे सुंदर प्लांटर बनवू शकता. यासाठी, एका मजबूत लाकडाचे ४ छोटे-छोटे पट्टे कापून घ्या. आता त्यांना स्क्रू आणि एल-क्लॅम्प्सच्या मदतीने एकाआड एक डावी-उजवीकडे जोडा. याला लक्झरी फील देण्यासाठी डार्क चॉकलेट रंगाने पेंट करा. तुम्ही हवं तर छोटी LED स्ट्रिप लावून याला आणखी आकर्षक बनवू शकता. हे लिव्हिंग रूम आणि गार्डनसाठी उत्तम पर्याय आहे.
कोणती रोपं लावावीत?
या शेल्फमध्ये चांगली जागा असल्यामुळे तुम्ही मनी प्लांट, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स यांसारखी वेलवर्गीय रोपं लावू शकता.

इंटरलॉकिंग स्क्वेअर प्लांटर शेल्फ
हे एक मॉडर्न आणि सिमेट्रिकल डिझाइनचं वुडन प्लांटर आहे. यात दोन चौकोनी फ्रेम्स एकमेकांमध्ये अडकवल्यासारख्या दिसतात. जर तुम्हाला दाट झाडं लावायची असतील, तर तुम्ही हे डिझाइन निवडू शकता. हे बनवण्यासाठी शिसम (Sheesham) किंवा सागवान (Teak) सारखं मजबूत लाकूड घ्या. त्याचे उभे-आडवे चौकोनी पट्टे कापून एक फ्रेम तयार करा. मध्ये आधार देण्यासाठी एक मोठा लाकडी ब्लॉक शेल्फच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये जोडा. शेवटी, डार्क नॅचरल वूड कलरने पेंट करा.
कोणती रोपं लावावीत?
हे शेल्फ थोडं रुंद असल्यामुळे तुम्ही स्पायडर प्लांट, सिन्क्रोमियम किंवा झेंडू-गुलाबासारखी पसरणारी रोपं लावू शकता.
मिनिमल अल्टरनेटिंग वुडन प्लांटर
हे प्लांटर खूपच सिंपल, सोबर आणि दिसायला आकर्षक आहे. या डिझाइनची प्रेरणा जपानी वुडन आर्टमधून घेतली आहे. यामध्ये एका सरळ लाकडी बेसवर छोटे-छोटे शेल्फ बनवले जातात. हे तयार करण्यासाठी, गुळगुळीत फिनिशिंग असलेली एक लाकडी फळी घ्या. त्यावर समान अंतरावर छोटे-छोटे उभे ब्लॉक्स खिळ्यांच्या मदतीने जोडा. शेवटी, नॅचरल रंगाने याला कलर करा.
कोणती रोपं लावावीत?
यामध्ये स्नेक प्लांट, पेपरोमिया आणि जेड प्लांटसारखी रोपं खूप सुंदर दिसतात.
स्टॅगर्ड क्यूब वुडन प्लांटर
DIY Planters हे एक जिग-झॅग स्टाईलचं ओपन शेल्फ असलेलं वुडन प्लांटर आहे. हे बनवण्यासाठी लाकडी फळ्यांना एकाच मापात कापून बॉक्ससारखा आकार द्या. लक्षात ठेवा की पुढचा भाग थोडा टोकदार असावा. आता हे क्युब्स स्क्रू किंवा फेविकॉलच्या मदतीने पायऱ्यांसारख्या पॅटर्नमध्ये एकमेकांना जोडा. भिंतीवर लावण्यासाठी ड्रिलच्या मदतीने छिद्र पाडून ते फिक्स करा.
त्रिकोणी आकाराचं वुडन प्लांटर
हे प्लांटर शेल्फ बनवण्यासाठी लाकडाचे तुकडे ३०-६० डिग्रीच्या कोनात कापा, जेणेकरून जोडल्यावर ते सुंदर दिसेल. आधी बाहेरची डायमंड शेपची फ्रेम तयार करा. लाकडाच्या जोडांवर फेविकॉल लावून स्क्रूने घट्ट करा. आता आतल्या बाजूला सरळ लाकडी ब्लॉक्स लावा. शेवटी, सँडपेपरने घासून वूड पॉलिश किंवा वॉर्निश लावा. यामुळे त्याची चमक टिकून राहील.
जिग-झॅग लायटनिंग शेल्फ
जर तुम्हाला कमी जागेत काहीतरी युनिक हवं असेल, तर हे जिग-झॅग लायटनिंग शेल्फ उत्तम आहे. हे बनवण्यासाठी लाकडी फळी ४५ डिग्रीच्या कोनात कापावी लागेल, जेणेकरून जोडल्यावर 'Z' आकार तयार होईल. यात एका सरळ फळीच्या टोकावर दुसरी फळी तिरकी जोडा. आता भिंतीवर लावण्यासाठी फ्लोटिंग शेल्फ ब्रॅकेट्स तयार करा. यात फर्न, इंग्लिश आयवी आणि सक्युलंट्स (succulents) सारखी हलकी आणि कमी वजनाची रोपं जास्त छान दिसतात.


