MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • विराट कोहली वर्ल्डकपपूर्वी घेणार निवृत्ती, माहिती देत काय म्हणाला?

विराट कोहली वर्ल्डकपपूर्वी घेणार निवृत्ती, माहिती देत काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये केलेल्या एका भावनिक वक्तव्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. 

2 Min read
Author : vivek panmand
Published : May 15 2026, 04:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
विराट कोहली वर्ल्डकपपूर्वी घेणार निवृत्ती, माहिती देत काय म्हणाला?
Image Credit : ANI

विराट कोहली वर्ल्डकपपूर्वी घेणार निवृत्ती, माहिती देत काय म्हणाला?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या खेळामुळे नव्हे तर निवृत्तीबाबत दिलेल्या संकेतांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. 2027 च्या वनडे वर्ल्डकपपूर्वीच तो क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
‘स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली तर...’
Image Credit : ANI

‘स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली तर...’

आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहलीने एक भावनिक वक्तव्य केलं. “जर मला स्वतःची योग्यता सिद्ध करण्याची वेळ आली, तर ती माझ्यासाठी योग्य जागा राहणार नाही,” असे तो म्हणाला. त्याच्या या विधानामुळे चाहत्यांनी निवृत्तीचे संकेत म्हणून त्याकडे पाहायला सुरुवात केली आहे.

Related Articles

Related image1
Fuel Shock: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं! तुमच्या शहरातले नवे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Related image2
Home Gardening: दिसायला सुंदर, पण....! ही झाडं लावण्याआधी दोनदा करा विचार
36
2027 वर्ल्डकप खेळणार का?
Image Credit : ANI

2027 वर्ल्डकप खेळणार का?

2027 च्या वनडे वर्ल्डकपबाबत विचारले असता विराटने “जर मी तेव्हा खेळत असेन तर...” असे उत्तर दिले. त्यामुळे तो आगामी काही वर्षांत क्रिकेटमधून दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तो फक्त वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय असून टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे.

46
विराटच्या वक्तव्याने चाहत्यांना धक्का
Image Credit : ANI

विराटच्या वक्तव्याने चाहत्यांना धक्का

विराट कोहलीचा जागतिक स्तरावर मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर त्याच्या प्रत्येक पोस्टला लाखो प्रतिक्रिया मिळतात. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये निराशा आणि भावनिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर “क्रिकेट विराटशिवाय अपूर्ण वाटेल” अशा भावना व्यक्त केल्या.

56
कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर भर
Image Credit : ANI

कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर भर

गेल्या काही वर्षांपासून विराट पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसोबत अधिक वेळ घालवत आहे. तो लंडनमध्ये स्थायिक झाल्याच्या चर्चाही अनेकदा समोर आल्या आहेत. क्रिकेटबरोबरच आता तो वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देताना दिसत असल्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.

66
क्रिकेटविश्वाचे लक्ष विराटच्या निर्णयाकडे
Image Credit : ANI

क्रिकेटविश्वाचे लक्ष विराटच्या निर्णयाकडे

विराट कोहलीच्या भविष्यातील निर्णयाकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. फिटनेस, फॉर्म आणि मानसिक तयारी या गोष्टींवर तो नेहमी भर देत आला आहे. त्यामुळे आगामी काळात तो नेमका कोणता निर्णय घेतो, याकडे चाहत्यांसह बीसीसीआयचंही लक्ष असेल.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
क्रिकेट बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Suryakumar Yadav: संजूला बाहेर बसवणं सर्वात कठीण होतं, पण...; सूर्याने सांगितले वर्ल्डकपमधील 'ते' किस्से
Recommended image2
Suryakumar Yadav: 'अजून 2 वर्षं कॅप्टन राहीन असं वाटलं होतं,' सूर्याचं मोठं वक्तव्य
Recommended image3
Raksha Bandhan: सेहवाग-रैनाची भावनिक पोस्ट, बहिणींसाठी शेअर केला खास मेसेज
Recommended image4
Virat Kohli: विराट कोहली असता तर निकाल वेगळा लागला असता...; कैफने टीम इंडियाला सुनावलं
Recommended image5
Vaibhav Sooryavanshi : द्रविड-सेहवागच्या मुलांची एन्ट्री, पण वैभव सूर्यवंशी U-19 टीमबाहेर, BCCI चा नियम काय?
Related Stories
Recommended image1
Fuel Shock: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं! तुमच्या शहरातले नवे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Recommended image2
Home Gardening: दिसायला सुंदर, पण....! ही झाडं लावण्याआधी दोनदा करा विचार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved