IPL 2026 मध्ये SRH ने RCB वर विजय मिळवला, पण सामन्यापेक्षा काव्या मारनच्या एका प्रतिक्रियेची जास्त चर्चा झाली. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित करत तिने केलेल्या इशाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती 'चकिंग' बद्दल बोलत असल्याचा अंदाज आहे.
IPL 2026 मधील Sunrisers Hyderabad आणि Royal Challengers Bengaluru यांच्यातील सामना रंगतदार ठरला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात SRH ने RCB वर 55 धावांनी मोठा विजय मिळवला. मात्र सामन्यापेक्षा एका व्हायरल क्षणानेच जास्त चर्चा रंगवली आहे. सामन्यादरम्यान हैद्राबाद संघाची मालकीण काव्या मारण हिची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. RCB चा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या गोलंदाजी करत असताना काव्या मारन काहीतरी बोलताना दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती कृणालच्या बॉलिंग अॅक्शनबाबत शंका उपस्थित करत असल्याचा दावा केला जात आहे.

काव्याने हातवारे का केले?
विशेष म्हणजे कृणाल पांड्याने टाकलेल्या एका शॉर्ट बॉलनंतर काव्या मारनने शेजारी बसलेल्या लोकांकडे पाहत हातवारे केल्याचं दिसून आलं. अनेकांनी तिच्या ओठांच्या हालचाली पाहून “चकिंग” असा शब्द वापरल्याचा अंदाज व्यक्त केला. यानंतर हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
आरसीबी संघाचा झाला पराभव
क्रिकेटच्या नियमांनुसार “चकिंग” म्हणजे गोलंदाजी करताना हात चुकीच्या पद्धतीने वाकवणे. मात्र कृणाल पांड्याच्या गोलंदाजीबाबत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पंचांकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा विषय सध्या केवळ चर्चेपुरताच मर्यादित असल्याचं बोललं जात आहे. या सामन्यात हैद्राबाद च्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. हेन्रीक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात RCB ला मोठा पराभव स्वीकारावा लागला, तरी संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं.
दरम्यान, काव्या मारनच्या या प्रतिक्रियेवर क्रिकेट चाहत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. काहींनी तिच्या भावनांना समर्थन दिलं, तर काहींनी हा फक्त सामन्यातील उत्स्फूर्त क्षण असल्याचं म्हटलं. मात्र या घटनेनंतर SRH आणि RCB यांच्यातील सामना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.


