MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathimynation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • लेटेस्ट न्यूज
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Sachin Tendulkar On Shubman Gill : डबल सेंच्युरिनंतर सचिनने केले शुभमनचे ''सारा''सार कौतुक, काय म्हणाला?

Sachin Tendulkar On Shubman Gill : डबल सेंच्युरिनंतर सचिनने केले शुभमनचे ''सारा''सार कौतुक, काय म्हणाला?

मुंबई - शुभमन गिलने ठोकलेल्या द्विशतकावर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अश्विन यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र सचिनची भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे. पहिल्यांदाच सचिनने एखाद्या खेळाडूचे एवढे कौतुक केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

2 Min read
Asianetnews Team Marathi
Published : Jul 04 2025, 01:09 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
14
पहिला आशियाई कर्णधार
Image Credit : Getty

पहिला आशियाई कर्णधार

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने द्विशतक (२६९ धावा) ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली. यासह SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

24
शुभमन गिलचे द्विशतक
Image Credit : X

शुभमन गिलचे द्विशतक

तसेच २३ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मानही त्याने मिळवला असून त्याने सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे. याशिवाय परदेशात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीचा विक्रमही शुभमन गिलने मोडला आहे.

अनेक विक्रम

याशिवाय, राहुल द्रविड (२००२ मध्ये ओव्हलवर २१७) आणि सुनील गावसकर (१९७९ मध्ये ओव्हलवर २२१) यांच्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. २५ व्या वर्षी आव्हानात्मक इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलवर सध्याचे आणि माजी क्रिकेटपटू आणि चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Related Articles

Shubman Gill Breaks 46-Year Gavaskar Record in England : शुबमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम! गावस्कर, द्रविड, सचिन यांच्यावर मात करत इंग्लंडमध्ये ठरला 'सर्वश्रेष्ठ'
Shubman Gill Breaks 46-Year Gavaskar Record in England : शुबमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम! गावस्कर, द्रविड, सचिन यांच्यावर मात करत इंग्लंडमध्ये ठरला 'सर्वश्रेष्ठ'
सौंदर्याची खाण असलेल्या सारा तेंडुलकरचे Australia तील ग्लॅमरस फोटो व्हायरल
सौंदर्याची खाण असलेल्या सारा तेंडुलकरचे Australia तील ग्लॅमरस फोटो व्हायरल
34
शुभमन गिलवर कौतुकाचा वर्षाव
Image Credit : Asianet News

शुभमन गिलवर कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेटचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, रविचंद्रन अश्विन आणि सुरेश रैना यांनी शुभमन गिलचे कौतुक केले आहे. याबाबत युवराज सिंगने एक्स वर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये, ''शुभमन गिलला सलाम. मोठ्या सामन्यात द्विशतक सहजगत्या झळकावले. छान खेळलास. पात्रतेचे द्विशतक. जेव्हा त्याचा हेतू स्पष्ट असतो तेव्हा तो अजिंक्य असतो याचे हे उदाहरण आहे'' असे म्हटले आहे.

सचिन काय म्हणाले?

शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा या दोन्ही खेळाडूंनी ज्या पद्धतीने खेळ दाखवला त्यामुळे मला खूप आनंद झाला, असे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाले. ''शुभमन गिलच्या कर्णधारपदाची ही एक उत्तम सुरुवात आहे. हे त्याला पुढे जाण्यासाठी एक चांगले जग तयार करेल. भारताने आता दिवसभर फलंदाजी करण्याची वेळ आली आहे'' असे रविचंद्रन अश्विन म्हणाले.

.@ybj_19 set the tone from ball one. He was positive, fearless and smartly aggressive.@ShubmanGill was cool as ever, calm under pressure, solid in defence and in total control.

Classy knocks from both. Well played, boys! pic.twitter.com/iyM30pO0Mn

— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 2, 2025

44
शाब्बास कर्णधार
Image Credit : Asianet News

शाब्बास कर्णधार

त्याचप्रमाणे भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण म्हणाला, ''इंग्लंडच्या भूमीवर २०० धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार. शुभमन गिलच्या डोळ्यातला निश्चय अगदी स्पष्ट दिसत होता. आकर्षक फटकेबाजीपासून ते मजबूत बचावापर्यंत या विशेष डावात सर्वकाही होते.'' ''नेतृत्व उत्तम होते! शाब्बास, कर्णधार! शुभमन गिलचा कर्णधाराचा डाव'' असे सुरेश रैना म्हणाले.

About the Author

Asianetnews Team Marathi
Asianetnews Team Marathi
क्रिकेट बातम्या
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Us
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved