Mumbai Indians : हार्दिक पांड्या आऊट; मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन कोण?
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्स टीमची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवल्यानंतर टीमची अवस्था खूपच खराब झाली. त्यामुळे आता हार्दिकला कॅप्टनन्सीवरून हटवणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्या आऊट
आयपीएल फॅन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी पुन्हा एकदा आपला जुना कॅप्टन, हिटमॅन रोहित शर्माकडे जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. आगामी आयपीएल २०२७ सीझनसाठी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. फ्रँचायझी मॅनेजमेंटने हार्दिक पांड्याला हटवून रोहितकडे पुन्हा नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्मासोबत आधीच चर्चा सुरू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने रोहित शर्मासोबत अनेकदा चर्चा केली आहे. फ्रँचायझीच्या विनंतीवरून रोहितने पुन्हा कॅप्टनन्सी स्वीकारायला होकार दिला आहे. आयपीएल २०२४ सीझनपूर्वी रोहितला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं होतं. पण २०२७ च्या सीझनपर्यंत या निर्णयाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
हार्दिक पांड्याचं भविष्य काय असणार?
रोहित शर्माच्या कमबॅकच्या बातम्यांमुळे हार्दिक पांड्याच्या भविष्याबाबत उत्सुकता वाढली आहे. गुजरात टायटन्समधून रोहितच्या जागी मुंबईत आलेला हार्दिक, कॅप्टन म्हणून पहिल्याच सीझनमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्या सीझनमध्ये मुंबईने १४ पैकी फक्त ४ मॅच जिंकल्या आणि टीम ९व्या नंबरवर राहिली. जर आयपीएल २०२७ च्या ट्रेड विंडोमध्ये हार्दिक दुसऱ्या टीममध्ये गेला नाही, तर तो रोहित शर्माच्या कॅप्टनन्सीखाली सामान्य खेळाडू म्हणून खेळायला तयार असल्याचं समजतंय.
कॅप्टनन्सीच्या शर्यतीत होती ही नावं
खरंतर, मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने मागचा सीझन संपण्यापूर्वीच कॅप्टन बदलण्याचा गंभीर विचार केला होता. रोहित शर्मासोबतच सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांच्या नावांचाही कॅप्टनन्सीसाठी विचार झाला. चर्चेदरम्यान रोहित शर्माने स्वतः युवा खेळाडू तिलक वर्माचं नाव पुढचा कॅप्टन म्हणून सुचवलं होतं. पण टीमला स्थिरता हवी असल्यामुळे मुंबईच्या मॅनेजमेंटने पुन्हा अनुभवी रोहित शर्मालाच मनवण्यात यश मिळवलं.
कोचिंग स्टाफच्या निवडीतही रोहितची छाप
फक्त एक खेळाडू म्हणूनच नाही, तर टीमच्या भविष्यातील प्लॅनिंगमध्येही रोहित शर्मा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई इंडियन्सच्या नव्या कोचिंग स्टाफच्या निवडीतही रोहितने आपली मतं मांडल्याची माहिती आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबईला चॅम्पियन बनवणारा रोहित पुन्हा कॅप्टन होणार असल्याने फॅन्सच्या अपेक्षा वाढल्या आहेत. २०२७ च्या सीझनपर्यंत या दोन सीनियर खेळाडूंचं कॉम्बिनेशन कसं असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

