सार
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड आपला संघ जाहीर करणारा पहिला देश ठरला आहे. न्यूझीलंड कडून अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा करण्यात आली आहे. मटिल्डा आणि अँगस या दोन लहान मुलांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली
न्यूझीलंडने T20 विश्वचषकसाठी आपला संघ जाहीर केला आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघ टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा किवी संघ पहिलाच संघ ठरला आहे. ग्लेन फिलिप्सलाही न्यूझीलंडच्या विश्वचषक T-20 संघात स्थान मिळाले आहे. ट्रेंट बोल्ट व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांनी देखील आपले स्थान निश्चित करण्यासाठी यशस्वी ठरले आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर करण्याच्या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंडमधील मटिल्डा आणि अँगस या दोन लहान मुलांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली, ज्यामुळे हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्डकपसाठी दोन लहान मुलांनी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा केली. तर संघाने T20 विश्वचषकासाठी नवी जर्सी लाँच केली आहे.
न्यूझीलंड संघ :
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी.
पहिला सामना अफगाणिस्तान समावेत :
T20 विश्वचषकात न्यूझीलंडचा पहिला सामना 7 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध गयाना येथे होणार आहे, त्यानंतर त्याला क गटातील सह-यजमान वेस्ट इंडिज, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी यांच्याशी सामने खेळावे लागतील.