विशेष म्हणजे, पहिल्या तीन आणि शेवटच्या दोन सामन्यांसाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या टीम्सची घोषणा केलीय.

वेलिंग्टन: भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडने आपली टीम जाहीर केली आहे. फिन ऍलन, लॉकी फर्ग्युसन आणि टिम सायफर्ट यांनी वनडे टीममध्ये कमबॅक केलंय. दुखापतीमुळे टी-२० सीरिजला मुकलेला रचिन रवींद्र पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी टीममध्ये परतला आहे. ही सीरिज ४ नोव्हेंबरला ऑकलंडच्या ईडन पार्कवर सुरू होणार आहे. न्यूझीलंडने पहिल्या तीन आणि शेवटच्या दोन सामन्यांसाठी दोन वेगवेगळ्या टीम्स जाहीर केल्या आहेत.

व्हाईट बॉल कॅप्टन मिचेल सँटनर या टीमचं नेतृत्व करणार आहे. शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी सात नवीन खेळाडू टीममध्ये सामील होतील. जे खेळाडू वनडे टीममधून बाहेर पडतील, ते टेस्ट टीमला जॉईन करतील. फिन ऍलन आणि लॉकी फर्ग्युसन २०२३ नंतर पहिल्यांदाच वनडे टीममध्ये आले आहेत. फर्ग्युसनने आपला शेवटचा वनडे सामना मुंबईत भारताविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये खेळला होता. तर टिम सायफर्टने १८ महिन्यांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या होम सीरिजमध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. हे तिन्ही खेळाडू सीरिजच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीममध्ये सामील होतील.

झॅक फाउल्क्स, विल ओ'रुर्के आणि बेन सीअर्स हे खेळाडू दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. गेल्या जानेवारीत भारतात झालेली वनडे सीरिज न्यूझीलंडने २-१ ने जिंकली होती. त्या सीरिजमध्ये खेळलेल्या बहुतांश खेळाडूंनी टीममध्ये आपली जागा कायम राखली आहे.

न्यूझीलंडचे हेड कोच रॉब वॉल्टर यांनी सांगितलं की, २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपआधी टीमची ताकद तपासण्याची ही एक उत्तम संधी आहे. हा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी न्यूझीलंडची टीम: मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट हेन्री, काईल जेमिसन, टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, विल यंग, ब्लेअर टिकनर.

शेवटच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडची टीम: मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, लॉकी फर्ग्युसन, मिच हे (विकेटकीपर), निक केली, टिम सायफर्ट (विकेटकीपर), ब्लेअर टिकनर, विल यंग.

YouTube video player