IPL 2026 मध्ये आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स धर्मशाळात आमनेसामने असतील. सलग तीन पराभवानंतर पंजाबला पुनरागमन करायचंय, तर दिल्लीसाठी एक पराभव प्लेऑफच्या आशा जवळपास संपवू शकतो.
11th May IPL 2026: आयपीएल 2026 च्या 55 व्या मॅचमध्ये आज, म्हणजे सोमवार 11 मे रोजी, पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होणार आहे. ही मॅच धर्मशाळात खेळली जाईल. पंजाब किंग्सने (PBKS) आयपीएल 2026 ची सुरुवात तर एकदम झोकात केली होती. एकामागोमाग एक मॅच जिंकत त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये टॉपचं स्थान मिळवलं होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. पंजाब सलग तीन मॅच हरलाय आणि टेबलमध्ये पहिल्या स्थानावरून खाली घसरला आहे.

सलग पराभव, पण कारणं वेगवेगळी
पण एक चांगली गोष्ट म्हणजे, जर पंजाबने आज धर्मशाळात दिल्ली कॅपिटल्सला हरवलं, तर ते पुन्हा टॉपवर पोहोचू शकतात. पण सलग चौथा पराभव झाला, तर टॉप-2 मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसेल. पंजाबच्या पराभवांमध्ये कोणतीही एकच कमजोरी दिसून आलेली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध टीम 222 रन्सचा मोठा स्कोर वाचवू शकली नाही. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध बॅटिंग करताना त्यांना फक्त 163 रन्स करता आले. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 236 रन्सचं टार्गेट चेस करताना ते हरले.
खराब फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी
या सगळ्या मॅचेसमध्ये टीमची फिल्डिंग ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. रिपोर्ट्सनुसार, पंजाबने आतापर्यंत 16 कॅच सोडले आहेत. एकट्या शशांक सिंगने 5 कॅच टाकले आहेत. या बाबतीत फक्त चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या पुढे आहे, ज्यांनी 17 कॅच सोडले आहेत.
...तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाहेर होणार
दिल्ली कॅपिटल्सची अवस्थाही फार काही चांगली नाही. टीमने मागच्या सहा मॅचपैकी पाच गमावल्या आहेत. नुकतंच कॅप्टन अक्षर पटेल म्हणाला होता की, टीम पुढच्या सीजनची तयारी आणि बेंच स्ट्रेंथला संधी देण्यावरही लक्ष देऊ शकते. अर्थात, दिल्ली अजूनही अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेली नाही. पण जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला हरवलं आणि दिल्ली पंजाबकडून हरली, तर DC चं स्पर्धेतून बाहेर होणं जवळपास निश्चित होईल. दिल्ली अजूनही शर्यतीत टिकून असल्यामुळे, टीम आपल्या सध्याच्या प्लेइंग XI वरच विश्वास ठेवू शकते.
मागच्या मॅचमध्ये पंजाबने रचला होता विक्रम
या सीजनच्या सुरुवातीला जेव्हा दोन्ही टीम्स दिल्लीत भिडल्या होत्या, तेव्हा पंजाब किंग्सने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा रन चेस पूर्ण केला होता. पंजाबने 265 रन्सचं मोठं लक्ष्य सात बॉल बाकी असतानाच गाठलं होतं. आता दिल्ली कॅपिटल्स ही मॅच जिंकून हिशोब चुकता करते की नाही, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल.
PBKS टीममध्ये बदलांचे संकेत
अजमतउल्ला ओमरजई टीममध्ये आल्यानंतर पंजाबचे बॉलिंग कोच जेम्स होप्स यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. हरप्रीत बरारला दुसरा स्पिनर म्हणून संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पंजाब किंग्स संभाव्य प्लेइंग XI
- प्रियांश आर्य
- प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
- कूपर कोनोली
- श्रेयस अय्यर (कर्णधार)
- मार्कस स्टोयनिस
- अजमतुल्लाह ओमरजई
- शशांक सिंग
- मार्को यानसन
- हरप्रीत बरार
- अर्शदीप सिंग
- युजवेंद्र चहल
- विजयकुमार वैशाक
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग XI
- पथुम निसंका
- केएल राहुल (विकेटकीपर)
- नीतिश राणा
- समीर रिझवी
- ट्रिस्टन स्टब्स
- अक्षर पटेल (कर्णधार)
- आशुतोष शर्मा
- विप्रज निगम
- मिचेल स्टार्क
- कुलदीप यादव
- लुंगी एनगिडी
- मुकेश कुमार


