भारताने बे ओव्हलवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव करत तिसरी वनडे मालिका जिंकली. फलंदाजीत अडचण आली असली तरी, अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी २०९ धावांचं टार्गेट यशस्वीपणे वाचवलं.

India vs New Zealand: भारताचा न्यूझीलंडवर रोमांचक विजय, मालिका खिशात

माउंट मौनगानुई [न्यूझीलंड], १५ नोव्हेंबर (एएनआय): भारतीय गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी बे ओव्हलवर झालेल्या लो-स्कोरिंग थ्रिलरमध्ये न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने न्यूझीलंडमधील आपली तिसरी वनडे मालिका जिंकली आहे. रविवारी बे ओव्हलवर झालेल्या या अंतिम वनडे सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर (३/३४), जेकब डफी (३/६०) आणि मॅथ्यू फिशर (२/२८) यांनी भन्नाट गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना स्थिरावू दिलं नाही. त्यामुळे भारतीय संघ ४२.१ षटकात २०९ धावांवर गारद झाला.

रोहित शर्मा (७) आणि विराट कोहली (५) लवकर बाद झाल्यानंतर, इशान किशन (५८ चेंडूत ४६, तीन चौकार आणि दोन षटकार), अक्षर पटेल (५५ चेंडूत ४६, पाच चौकार आणि एक षटकार) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२६ चेंडूत २२, तीन चौकार) यांनी चांगली सुरुवात केली आणि काही आश्वासक भागीदारी केल्या. रन चेस करतानाही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. अर्शदीप सिंग (३/३०), मोहम्मद सिराज (२/५०), आकिब नबी (१/३७) आणि यश ठाकूर (१/३८) यांनी किवी फलंदाजांना जखडून ठेवलं. न्यूझीलंडकडून डीन फॉक्सक्रॉफ्ट (३१) याने सर्वाधिक धावा केल्या. भारताने २००९ आणि २०१८-१९ च्या हंगामानंतर न्यूझीलंडमध्ये आपली तिसरी वनडे मालिका जिंकण्याची किमया साधली आहे.