IND vs NZ 1st Test 2026: वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय फलंदाजांनी हा मोठा कारनामा केला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या भारतीय संघ ११८ धावांनी आघाडीवर आहे.

IND vs NZ 1st Test 2026: वेलिंग्टनमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारतीय संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला आहे. एका परदेशी कसोटी सामन्याच्या एकाच डावात पहिल्या पाचही फलंदाजांनी ५० हून अधिक धावा (IND vs NZ 1st Test 2026) करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे (India vs New Zealand Test Match).

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची ऐतिहासिक कामगिरी

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना किवी संघ ३६८ धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार टॉम लॅथम शून्यावर बाद झाला, तर डेव्हॉन कॉनवेला फक्त ४ धावा करता आल्या. पण मधल्या फळीत हेन्री निकोल्सने शानदार फलंदाजी करत १७५ धावांची जबरदस्त खेळी केली. रचिन रवींद्रने १५ धावा, डॅरिल मिचेलने १ धाव आणि यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलने ५ धावा केल्या. मात्र, ग्लेन फिलिप्सने तळाला येऊन ११८ धावांची शानदार शतकी खेळी केली.

Scroll to load tweet…

याशिवाय नॅथन स्मिथने १४ धावा, काईल जेमिसनने ११ धावा, मॅट हेन्रीने १ धाव आणि जेकब डफीने ४ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४ बळी घेतले, तर आकाश दीपला ३, अंशुल कंबोजला २ आणि प्रसिद्ध कृष्णाला १ बळी मिळाला. प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वालने ८५ धावांची दमदार खेळी केली. तसेच केएल राहुलने १३६ धावांचे शानदार शतक झळकावले. देवदत्त पडिक्कलने ८० धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलचे शतक थोडक्यात हुकले, तो ९८ धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ४ गडी गमावून ४८६ धावा केल्या आहेत. यष्टिरक्षक ऋषभ पंत ५५ धावांवर आणि अंशुल कंबोज ० धावांवर नाबाद आहेत. भारताने ११८ धावांची आघाडी घेतली आहे.

कोणता विक्रम रचला शुभमन आणि टीमने?

या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. परदेशातील कसोटी सामन्याच्या एकाच डावात भारताच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी ५० हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत या सर्वांनी अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात पहिल्या पाच फलंदाजांनी अर्धशतके झळकावण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी भारतीय संघाने मायदेशात चार वेळा असा पराक्रम केला आहे. पण परदेशात असा विक्रम नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे.