PBKS vs GT: आयपीएल २०२६ च्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सवर ३ विकेट्सने विजय मिळवला आहे. कूपर कॉनलीच्या शानदार खेळीच्या जोरावर पंजाबने हे लक्ष्य गाठलं आणि या सीजनमधला एक महत्त्वाचा विजय आपल्या नावे केला.

आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने एका रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सला ३ विकेट्सने हरवलं आहे. १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने १९.१ ओव्हर्समध्येच सामना जिंकला. या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे कूपर कॉनली. त्याने ४४ चेंडूंत नाबाद ७२ धावांची शानदार खेळी केली. त्याला प्रभसिमरन सिंगने ३۷ धावा करून चांगली साथ दिली. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, पण त्याची ही कामगिरी टीमला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.

गुजरातच्या डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती. त्याची लाईन आणि लेन्थ अनेकदा चुकली, ज्यामुळे काही वाईड आणि एक नो-बॉलही पडला. मात्र, एवढ्या दबावातही अर्शदीपने गुजरात टायटन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा फायदा घेऊ दिला नाही.

गुजरातकडून राहुल तेवतियाने एक महत्त्वाचा चौकार नक्कीच मारला, पण अर्शदीपच्या यॉर्कर आणि स्लो बॉल्ससमोर तो सातत्याने मोठे फटके खेळू शकला नाही. यादरम्यान मैदानावर काहीशी गडबडही पाहायला मिळाली, ज्यात ओव्हरथ्रो आणि लेग साईडच्या बॉलवर घेतलेला रिव्ह्यू यांचा समावेश होता. रिव्ह्यूमध्ये बॉल बॅटला लागला नसल्याचं स्पष्ट झालं.

एकंदरीत, शेवटची ओव्हर थोडी विस्कळीत झाली आणि काही अतिरिक्त धावा गेल्या, पण पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. आता सामना जिंकण्यासाठी पंजाब किंग्सला २० ओव्हर्समध्ये १६३ धावा करायच्या होत्या, ज्या त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या.

आयपीएल २०२६ चा थरार आता चांगलाच वाढू लागला आहे. स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या टीमने प्रथम फलंदाजी केली. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही टीममध्ये काही नवीन खेळाडूंना संधी मिळाली. गुजरात टायटन्सने दोन, तर पंजाब किंग्सने एका नवीन खेळाडूला संधी दिली.

गुजरात टायटन्सकडून दोन खेळाडूंचं पदार्पण

गुजरात टायटन्सने या सामन्यात दोन नवीन खेळाडूंना पहिल्यांदाच संधी दिली. टीममध्ये ग्लेन फिलिप्स आणि अशोक शर्मा यांचं पदार्पण झालं. हे दोन्ही खेळाडू आपल्या कामगिरीने सामन्यात प्रभाव पाडतील, अशी टीमला अपेक्षा होती. विशेषतः ग्लेन फिलिप्स त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि फिल्डिंगसाठी ओळखला जातो.

पंजाब किंग्सने कूपर कॉनलीला दिली संधी

दुसरीकडे, पंजाब किंग्सने या सामन्यात कूपर कॉनलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केलं. तो टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास टीम मॅनेजमेंटला होता. पंजाबची टीम या सामन्यात अनुभवी आणि तरुण खेळाडूंच्या चांगल्या मिश्रणामुळे संतुलित दिसत होती.

मागच्या वेळी पंजाबने मारली होती बाजी

मागच्या सीजनबद्दल बोलायचं झालं, तर पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये फक्त एकच सामना झाला होता आणि तो खूपच रोमांचक ठरला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २४३ धावांचा डोंगर उभारला होता. त्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ९७ धावांची शानदार खेळी केली होती. याच्या उत्तरात गुजरात टायटन्सच्या टीमने पूर्ण प्रयत्न केले, पण ते २३२ धावांपर्यंतच पोहोचू शकले आणि पंजाबने तो सामना ११ धावांनी जिंकला होता.

यावेळी गुजरात हिशोब चुकता करणार का?

मागच्या पराभवामुळे गुजरात टायटन्सची टीम या सामन्यात हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने उतरली होती. कर्णधार शुभमन गिलसमोर पंजाबच्या घरच्या मैदानावर विजय मिळवण्याचं मोठं आव्हान होतं. तर दुसरीकडे, पंजाब किंग्सलाही हा सामना जिंकून स्पर्धेत दमदार सुरुवात करायची होती, आणि त्यांनी ती केली.

गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन

साई सुदर्शन, शुभमन गिल, जॉस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज.

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन

प्रभसिमरन सिंग, कूपर कॉनली, श्रेयस अय्यर, नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोयनिस, मार्को यानसन, झेवियर बार्टलेट, विजय कुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.